Vikram Pasale
Rutuja Bhalerav
Prashant Batule
लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी चि.विक्रमसिंह पासले,कु.ऋतुजा भालेराव व द्वितीय वर्षातील विद्यार्थी चि.प्रशांत बटुळे यांची नुकतीच ‘इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४’ या दोन महिन्यांच्या पेड इंटर्नशीप प्रशिक्षणासाठी निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली….
इंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते.प्रत्येक वर्षी इंटर्नशाला ही संस्था देशभरातील मोजक्या व नामांकित महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची आपल्या या कार्यक्रमासाठी ‘स्टुडन्ट पार्टनर’ म्हणून निवड करत असते.याच कार्यक्रमासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या विद्यार्थ्यांना ४ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत या कार्यक्रमाचे स्टुडन्ट पार्टनर म्हणून काम पहायचे आहे व त्यासाठी त्यांना त्यांच्या प्रगती अहवालानुसार इंटर्नशाला या संस्थेकडून विशेष मानधन ही मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खासदार.डॉ.सुजयदादा विखे पाटील, संस्थचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोकराव कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, तांत्रिक संचालक डॉ.के व्ही टी रेड्डी,अतांत्रिक संचालक डॉ.दिगंबर खर्डे,आस्थापना संचालक डॉ.हरिभाऊ आहेर, संस्थचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ.धनंजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषीकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.