लोणी येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या अंतर्गत आय.सी .आय.सी .आय बँकेचे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले या मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची सिनियर ऑफिसर या पदावर नोकरी साठी निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.
.यामध्ये कु.अमृता आढाव,कु.ऋतुजा बहिरट,कु. पूजा थोरात,मनीष गोलाईटकर ,योगेश धोंडगे यांची आय.सि.आय.सि.आय बँकेमध्ये सिनियर ऑफिसर म्हणून निवड झाली असून प्लेसमेंट अधिकारी प्रा.शेळके प्रा.प्रविण गायकर,प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे ग्रहनिर्माण मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, युवा नेते खा.डॉ.सुजय विखे पाटील, संस्थचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, तांत्रिक संचालक डॉ.के व्ही टी रेड्डी,अतांत्रिक संचालक डॉ.दिगंबर खर्डे,आस्थापना संचालक डॉ.हरिभाऊ आहेर, संस्थचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ.धनंजय आहेर, कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे यांनी विशेष अभिनंदन केले..