हरितक्रांतीचे प्रणेते असी ओळख असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त प्रवरा कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कृषिदिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती. प्राचार्य सौ. अरुणा थोरात यांनी दिली.
लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील पर्यावरणशास्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक एस. एस गौरखेडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये पर्यावरणाचा समतोल कसा राखावा तसेच पर्यावरण आणि शेती यांचा परस्परांशी असलेला संबंध या विषयी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी उपप्राचार्य एस. व्ही. भांड , प्रा जे.बी. ब्राम्हणे,प्रा. एन एस. लव्हाटे,प्रा. ए. एस. साळवे इतर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.