आवडीनुसार महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना पालकांकडून हळूहळू स्वातंत्र्य मिळत असले तरी,स्वावलंबी आयुष्य जगताना मुलांना आत्मविश्वास मिळण्यासाठी धावपळ आणि धकाधकीच्या जीवनातील पालकांनी आपल्या मुलांशी लक्ष आणि सुसंवाद ठेवावा असे प्रतिपादन कृषिभूषण बन्सी पाटील तांबे यांनी केले.
लोणी येथील प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आणि लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या पाल्यांच्या अभ्यासातील प्रगती पालकांना समजावी या साठी आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक आणि पालक मेळाव्यात प्रेमिक पाहुणे म्हणून बन्सी पाटील तांबे बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ,प्राचार्य दत्तात्रय थोरात,सौ.औटी,श्री देशमुख श्री जाधव,श्री हारदे प्रा दत्तात्रय थोरात, प्रा. विशाल तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रा. प्रदीप घुले यांनी प्रस्ताविक केले.
या वेळी प्रा. विशाल तांबे ,प्रा वैशाली अरगडे यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. प्रा जालिंदर पाटील यांनी आभार व्यक्त केले.
फोटो कॅप्शन :- लोणी येथील प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आणि लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक आणि पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना कृषिभूषण बन्सी पाटील तांबे समवेत प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ,प्राचार्य दत्तात्रय थोरात,प्रा. प्रदीप घुले, प्रा. विशाल तांबे प्रा वैशाली अरगडे आदी.