बदलत्या काळानुसार ग्रंथ संग्रहालये हायटेक होणार होत असून वाचकांना घरबसल्या इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकणार असल्याने ग्रंथपालांनी सोशीयल मेडीयाच्या काळात ग्रंथालयाचे महत्व वाढवावे असे प्रतिपादन सौ.भारती बॅनर्जी यांनी केले.
लोकनेते पद्मभुषन डॉ.बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ.विखे पाटील महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात “आजच्या सोशीयल मेडीयाच्या काळात ग्रंथपालांचे कार्य व ग्रंथालयीन सेवेचे महत्व” या विषयी सौ.भारती बॅनर्जी यांचे उद्बोधनात्मक व्याख्यान संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा. विजय आहेर होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक ग्रंथपाल डॉ.बाळासाहेब आहेर यांनी केले. या वेळी ग्रंथपाल डॉ .अनिल पवार, श्री.तुरकने यांनी ग्रंथपालांच्या समस्या मांडल्या, श्री.बाळासाहेब कोरडे, श्री.आदिनाथ दरंदले, श्री.पोपट आव्हाड ,श्री. लक्ष्मीण पानसरे,सौ. विजया तांबे, सौ.मीरा काकडे श्री.नामदेव पांढरकर आदिसंह संस्थेच्या विवीध शाखेतील ग्रंथपाल उपस्थीत होते उपस्थीत होते.
” आज अनेक शाळा , महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील ग्रंथ संग्रहाचा वापर पुरेशा प्रमाणात वाचक, विद्यार्थी ,शिक्षक करतांना दिसत नाही ,वाचनाचे फायदे आपल्या सर्वांना ज्ञात असुन सुद्धा आजच्या सोशीयल मेडीयाच्या दुनीयेत ..वाचक वर्ग दुरावत चालला आहे या करीता इ-लायब्ररी चे सभासदत्व प्रत्येक ग्रंथपालांनी ,वाचकांनी व्हावे ,इ-जर्नल चे प्रमाण वाढवा ,मासीकांचा वापर ग्रंथालयात वाढवा,संगणकीकृत अद्यायावत ग्रंथालयीन सेवा वाचकांना ग्रंथपालांनी दिल्यास निश्चितच ग्रंथालयाचे महत्व वाढेल ,अनेक ग्रंथालयाच्या अडी अडचणी असतात त्या वेळेत सोडवुन घ्या” असे प्रतिपादन सौ.भारती बॅनर्जी यांनी व्यक्त केले., शेवटी आभार ग्रंथपाल श्री उल्हास देव्हारे यांनी मानले.