तामिळनाडू (कोईम्बतूर) येथे पार पडलेल्या देशपातळीवरील ‘गो कार्ट्स झिझाईन चॅलेंज’ स्पर्धेत प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयातीच्या मेकॅनिकल विभागातील मिळाला असल्याचे सांगताना देशभरातुन सहभागी झालेल्या सुमारे १५० टीम बरोबर स्पर्धाकरताना मिळालेला प्रथम क्रमांक हा प्रवरेला मिळालेला मोठा बहुमान असल्याचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले.
नुकत्याच १० ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधी मध्ये तामिळनाडू करी मोटार स्पिडवे येथे पार पडलेल्या ‘गो कार्ट्स झिझाईन चॅलेंज’ या स्पर्धेत देशभरातील सुमारे ३० संघ सहभागी झाले होते. प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. राजेंद्र खर्डे,प्रा. पद्माकर कडबूके प्रा. निलेश मनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन प्रदयुमन घोरपडे,व्हाईस कॅप्टन वैभव सोनावणे, चालक लॉरेन्स बनसोडे,सोमेश ठोंबरे,ऋषिकेश वाघचौरे,प्रितेश पाटील,विकास घोडेराव,प्रसाद बनसोडे.आशिष तुपे, नरेश कदम,सुयोग टिळेकर,सलमान घोणे,कु. अस्विनी मंडलिक,कु. अदिती जगदाळे,मुकुंद मरकड सत्यम भांगे,प्रणित बांगर,राहुल धनवटे,शुभम शेळके,जय, अकोलकर,निवास मुक्ते, हितेश शिंगले,प्रतीक पाटील, प्रीतम सिनारे,प्रसाद गायकवाड,संकेत गुंजाळ,निखिल गडादे अक्षय गाडेकर या मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील उत्साही आणि मेहनती विद्यार्थ्यांनी हि कर बनवली आहे. या साठी सुमारे १ लाख ५० हजार इतका खर्च आलेला आहे.
प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने म्हणाले कि, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेली कार या पूर्वीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “स्टुडन्ट कार्ट डिझाईन चॅलेंजेस” या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अव्वल ठरली होती. तसेच हैद्राबाद येथील भारतीय तांत्रिक विभागाच्या सोसायटी ऑफ मेकॅनिकल अँण्ड ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स या मानाच्या देशपातळीवरील स्पर्धेत या कार्ल बहुमान मिळाला होता असे सांगितले.
चौकट: प्रवरेतील तांत्रिक शाखांमधून शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यात एक सक्षम अभियंता व्हावा यासाठी संस्थेचा नेहमीच प्रयन्त असतो असे सांगताना विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहित करणाऱ्या प्राध्यापक आणि सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सौ. शालिनीतली विखे पाटील यांनी अभिनंदन केले.