प्राप्त परिस्थिती मुळे शिक्षण घेता आले नाही, पण तुम्ही सर्व विद्यार्थी हे शिकलेले आहात, लिहता वाजता येत नसतानासुध्दा मी हे काम करू शकते तर, तुम्ही का नाही करू शकणार, तुमच्यातच एक राहीबाई तयार करा व आपल्या गावाचे, तालुक्याचे तसेच आपल्या परिवाराचे नाव लौकिक करा असे प्रतिपादन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
लोणी येथे लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी महाविद्यालयात महिला दिनानिमित्त बिजमाता पद्मश्री सौ.राहीबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी कृषीभूषण सौ.सुजाता थेटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य रोहित उंबरकर, प्राचार्य ऋषिकेश औताडे,प्राचार्य निलेश दळे,प्रा.मिनल शेळके, प्रा.अक्षया वाळुंज, प्रा.सारिका फरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एक सामान्य कुटुंबातील शेतकरी महिला राहीबाई यांनी आपल्या गावाचे नाव लौकिक केले, जसे त्यांच्या घरात औषधें व रासायनिकयुक्त फळे भाजीपाला खाल्याने आपल्या बालकांचे आरोग्य खराब होते त्यासाठी सेंद्रिय शेतीच हा पर्याय आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहीबाई पोपरे तसेच राहीबाई, यांच्या बियाणे बँकेचे आदीवासी परंपरेने जपलेल्या ५३ पिकांचे ११४ गावरान वाण आहेत. त्यामुळे त्यांच्या बियाणे बँकेत नक्कीच भेट द्या असे आवाहन सौ.सुजाता थटे यांनी विद्यार्थ्यांना केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सायली इंगळे यांनी व्यक्त केले.
फोटो कॅप्शन :- लोणी येथे कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी महाविद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना पद्मश्री सौ.राहीबाई पोपेरेदिसत असून समवेत कृषीभूषण सौ.सुजाता थेटे पाटील,कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य रोहित उंबरकर, प्राचार्य ऋषिकेश औताडे,प्राचार्य निलेश दळे,प्रा.मिनल शेळके, प्रा.अक्षया वाळुंज, प्रा.सारिका फरगडे आदी.