प्रवराच्या अभ्यासिकेमुळे माझे स्वप्न साकार- सीए दीपिका शिंगवी

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी दीपिका संजय शिंगवी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. प्राथमिक पासून तर इयत्ता दहावी पर्यंत दीपिकाचे शिक्षण या विद्यालयामध्ये झाल. सुरुवातीपासूनच विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक टिकवला. इयत्ता अकरावीपासूनच चार्टर्ड अकाउंटंट स्पर्धा परीक्षेची तयारी तिने सुरू केली होती. चार्टर्ड अकाउंटंट ची स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी तिने कोल्हार येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रवरा अभ्यासिके मध्ये प्रवेश घेतला.आपल्या मेहनतीने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तिने यश मिळविले. आई-वडील आणि शिक्षक त्यांच्याबरोबरच माझ्या या यशामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरू केलेल्या या प्रवरा अभ्यासिकेचा खूप मोठा वाटा असल्याचे दीपिका ने सांगितले.