प्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे विश्वस्त माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जि.प.सदस्या रोणीनीताई निघुते,संस्थेचे सर्व संचालक, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सह सचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे, प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे यांच्यासह सर्व प्राचार्य विद्यार्थी उपस्थित होते.
प्रवरा शैक्षणिक संकुल आणि प्रवरा उद्योग समुह येथे राज्याचे महसुल,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंञाचा अमृत महोत्सव आणि”हर घर तिरंगा..हर मन तिरंगा “या अंतर्गत प्रभात फेरी,पथनाट्य,चिञरथ याबरोबरचं विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक संकुलात स्वातंञ्याचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष सप्ताह सुरु असून यामध्ये शिक्षक,पालक सर्व नागरीकांचा सहभाग घेण्यात येत आहे.
आजच्या स्वातंञदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यानी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रमातून सर्वधर्म समभावांची शिकवण देण्यात आली.मान्यवरांना संस्थेतील एन.सी.सी.,सुरक्षा कर्मचारी यांनी मानवंदना दिली.