सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत एप्रिल- मे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्रच्या अंतिम परीक्षेत लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून महाविद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम राखत. यशाची कमान उंचावत नेली असल्याची माहिती प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.
या वर्षी द्वितीय वर्ष. तृतीय वर्ष व चतुर्थ वर्ष बी. फार्मसी या तीनही वर्षांचा निकाल१००% लागला आहे, यात द्वितीय वर्ष अभ्यास्क्रमातून एकूण ६२ विध्यार्थ्यांपैकी ५० विध्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी, १२ विध्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले , तृतीयवर्ष अभ्यास्क्रमातुन एकूण ६३विध्यार्थ्यांपैकी ५६ विध्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी, ७ विध्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले व चतुर्थ वर्ष अभ्यास्क्रमातुन एकूण ६३विध्यार्थ्यांपैकी६० विध्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी, ३ विध्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले.
यात द्वितीय वर्ष अभ्यासक्रमातअनुक्रमे कु.श्रद्धा काशिद ( एस. जी. पी.ए. ८.७८६), कु.स्नेहल राहाते ( एस. जी. पी.ए. ८.५७१), कु. रेखा शिंदे ( एस. जी. पी.ए. ८.३२१) व कु. अंजली सोनवणे( एस. जी. पी.ए. ८.३२१), तृतीय वर्ष अभ्यासक्रमातुन अनुक्रमे कु. वैष्णवी वाघ ( एस. जी. पी.ए. ८.८०६), कु. कांचन जंगम ( एस. जी. पी.ए. ८.४८४),व कु. चैत्राली काळे ( एस. जी. पी.ए. ८.३५५) तसेच चतुर्थ वर्ष अभ्यासक्रमातुन अनुक्रमे कु. प्राजक्ता तांबे ( सी. जी. पी.ए. ८.४१९), कु. प्रभाकर कातकाडे ( सी. जी. पी.ए. ८.३१४), कु. श्रद्धा मंडलिक ( सी.जी. पी.ए. ८.२८४) गुण मिळवून विशेष प्रविण्यासहित प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाने उत्तीर्ण झाले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत उज्वल निकालाची परंपरा कायम राखली. या सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्यास परिषदेच्या अध्यक्ष्या ना. सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री . भारत घोगरे, तांत्रिक-शिक्षण संचालक, डॉ. के.टी.व्ही. रेड्डी, यांनी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.