लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.
या कार्यशाळेत पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील मराठी विषयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. शांताराम चौधरी यांनी दिव्यांगासाठी “भविष्यातील वाटचाल व संधी” या विषयावर मार्गदर्शन केले, त्यात त्यांनी दिव्यांगासाठी सरकारी नोकरी, वेगवेगळ्या संधी अस्या सर्व बाबींवर उपस्थितांचे लक्ष वेधले व सखोल माहिती दिली, या सत्रास परिसरातील विविध क्षेत्रातील दिव्यांग, विध्यार्थ्यांचा उत्स्पुर्थ प्रतिसाद लाभला या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी व्हर्चू फार्मासुटीकल्स, श्रीरामपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गागरे होते, सत्राचे प्रास्ताविक प्रा. हेमलता भवर यांनी केले, समारोप प्रसंगी आभार महाविद्यालयाचे प्रा. सोमेश्वर मानकर यांनी मानले, सदर कार्यशाळेस सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :- लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी व्हर्चू फार्मासुटीकल्स, श्रीरामपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गागरे, प्रा. डॉ. शांताराम चौधरी, प्राचार्या डॉ. प्रिया राव, प्रा. हेमलता भवर यांनी केले, प्रा. सोमेश्वर मानकर आदी.