स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या जनरल ड्युटी या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी सुजित संजय मोरे आणि सौरभ भाऊसाहेब खोबरे यांची सीआयएसएफ मध्ये निवड झाली तर दिपिका संजय शिंगवी हीने सी.ए परिक्षेतयश संपादन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अभ्यास करता यावा या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहेत. त्यांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध सेवा सुविधा देत असताना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन संदर्भ पुस्तकांसाठी ग्रंथालय, क्रिडा शिक्षकांकडून मार्गदर्शन प्रवरा स्पर्धा परीक्षा केंदामार्फत दिले जाते. या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना आजपर्यंत या केंद्राचा लाभ झाला असून या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्य जनतेची मुले आज सरकारी आणि निसरकारी पदावरती काम करत आहेत.