लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थी प्रतिक चौधरी याची इस्त्राईल येथे किबुत्स स्वयंसेवक कार्यक्रमासाठी तेल अविव, इस्त्राईल येथे निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.
१९६७ साली सहा दिवसांच्या युद्धानंतर, संपूर्ण जगभरातील स्वयंसेवकांचा एक भाग इस्राईलमध्ये येण्यास सुरवात झाली. त्यांचा मुळ उद्देश इस्राईल लोकांकडे किबुत्स स्वयंसेवक बनून त्यांना प्रोत्साहित करणे हा होता. एक समाजवादी समाजाच्या खऱ्या तत्त्वांचे पालन करणाऱ्या किबुत्स समाजाची कल्पना, सर्व कार्य, संपत्ती आणि त्यांच्या सदस्यांसह समान वाटा मिळवून देणारे कार्य स्वयंसेवकांना प्रोत्साहित करते. या विशिष्ट समुदायाचा भाग बनण्याची इच्छा परदेशींमध्ये सुद्धा आज वाढली आहे. थोड्याच कालखंडात विविध देशातील हजारो स्वयंसेवक इस्रायलमध्ये किबुत्स स्वयंसेवक बनण्याच्या उद्देशाने दरवर्षी येतात. याचाच भाग म्हणून एकूण एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत प्रतिक चौधरी हा दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन यामध्ये एक हजार गायी व दीड लाख कुकुट पालन यांमधून मिळणाऱ्या उत्पन्न वाढीसाठी काम करत असताना त्याला प्रतिमाही रु. एक्कावण हजार विद्या वेतनही मिळत आहे. अशा नामांकित संस्थेत स्वयंसेवक म्हणून इंटर्नशीप करण्याची संधी पदवी प्राप्त होण्या अगोदरच मिळाल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे व यामुळे महाविद्यालयाचे परदेशातही नावलौकिक होत आहे.
या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, आस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक डॉ. धनंजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.