पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान व सिमेसीस लर्निंग एलएलएलपी अंतर्गत कृषिक्षेत्रात व्यावसाईक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगारक्षम वयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण मिळावे या अनुषंगाने लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ या पहिल्या ४० विद्यार्थ्यांच्या वर्गाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु झाला.असल्याची माहिती संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सह-सचिव श्री. भारत घोगरे, कौशल्य झोनल म. फु. कृ. वि. राहुरी समन्वयक श्री. दिलीप क्षीरसागर, संस्थेचे कौशल्य विकास संचालक प्रा. धनंजय आहेर, प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे व महाविद्यालय कौशल्य योजना समन्वयक प्रा. स्वप्नील नलगे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ या विषयातील संधी व व्यवसायासाठी प्रशिक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच हे प्रशिक्षण हे निशुल्क असून, पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, भारत सरकार यांचे द्वारे प्रमाणपत्र देण्यात येणार असून रोजगार व नोकरी मिळण्यापर्यंत मदत केली जाणार असल्याने जास्तीत जास्त युवकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन श्री. दिलीप क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सूक्ष्म सिंचन प्रशिक्षक श्री. शुभम गायकवाड तसेच आभार केंद्र समन्वयक श्री. संदीप समासे यांनी मानले.
फुटी कॅप्शन ;- लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ या पहिल्या ४० विद्यार्थ्यांच्या वर्गाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करतानाकृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, सह-सचिव श्री. भारत घोगरे, म. फु. कृ. वि. राहुरी समन्वयक श्री. दिलीप क्षीरसागर, प्रा. धनंजय आहेर, प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे प्रा. स्वप्नील नलगे आदी.