प्रवरेच्या सात विद्यार्थीनीचे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत यश

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने १४ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा नुकतीच मालवण सिंधुदुर्ग पार पडली. या स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणीच्या सात विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धे मध्ये मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर सांगली सातारा रायगड इ. तसेच भारतातील एकूण बाराशे खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या तीन विद्यार्थिनी तर प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या चार विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला ही स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटानुसार घेण्यात आली. प्रवरा कन्या विद्या मंदिरची सिद्धी गणेश सोंगाडे (३ कि. मि) सृष्टी कारभारी जाचक(३ कि. मी) मृणाल किरण माने (३ कि. मी) तसेच प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलची भाग्यश्री ईश्वर मार्कडे (५ कि. मी) गौरी ग्यानोबा मजरे (३ कि. मी) राजश्री ईश्वर मार्कडे (३ कि. मी) दिवेकर सावरी गणेश दिवेकर (३ कि. मी) या सर्व जलतरणपटूंनी ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे