ह.भ.प भानुदासमहाराज बेलापूरकर यांनी १८३६ साली सुरु केलेल्या श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर ते पंढरपूर या संत निवृत्ती महाराज यांच्या पालखी पायी दिंडीचे आगमन प्रवरा परिसरात झाल्यानंतर लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग घेऊन ग्रामसफाई बरोबरच वारकऱ्यांचे प्रबोधन,आरोग्य जनजागृती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्याचे काम केले.
सुरवातीला स्वयंसेवकांनी दिंडीचा मुक्काम असलेल्या गोगलगाव आणि लोणी खुर्द गावामध्ये साफसफाई केली. त्यानंतर सर्व वारकऱ्यांना नास्ता-चहापाणी वाटप केले. वारकऱ्यांचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने वारकऱ्यांच्या आरोग्या विषयी प्रबोधन करताना पर्यावरणाचा समतोल राखला जावा या साठी कृतीतून संदेश दिला.
पद्मश्री विखे पाटील मंहाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक सैदव समाजाप्रती आपली बांधिलकी जपत असतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, उप-प्राचार्य डॉ. रामचंद्र रसाळ,डॉ. जयसिंगराव भोर,प्रा. दत्तात्रय थोरात,यांचेसह रा.से.योजनेचे कार्यकारी अधिकारी डॉ. दिनकर तांबे,प्रा. रोहित भडकवाड आणि डॉ. प्रतिभा कानवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो कॅप्शन :- श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर ते पंढरपूर या दिंडीचे प्रवरा परिसरात आगमन झाल्यानंतर,ग्रामसफाई बरोबरच वारकऱ्यांचे प्रबोधन,आरोग्य जनजागृती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देताना लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक