लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाने जर्मनी मधील नामांकित “व्याटक्राफ्ट इंडस्ट्रीज प्रा. लि आणि “नेक्स्ट टू सन एर्जी” या सौर उर्जा तंत्रज्ञान विकसित करणा-या कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आला.सदर करारानुसार जर्मनीतील या दोन मानांकित कंपन्या प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरती “व्हर्टीकल बायफेसिअल सोलर” तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तयार करणार असल्याचे महसूल मंत्री आणि संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांना नेहमीची शेती करत असतांना सौर उर्जा निर्मीती करणे शक्य होणार आहे. सदर तंत्रज्ञान हे “नेक्स्ट टू सन एर्जी” या कंपनीने विकसित केलेले असून संपूर्ण जगभरामध्ये याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम “व्याटक्राफ्ट इंडस्ट्रीज प्रा. लि” ही कंपनी करणार आहे. सदर प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी संपूर्ण भारतातून एकमेव प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाची निवड करण्यात आली असल्याचे विखे पाटील म्हणाले.
मुंबई येथील हॉटेल ताज मध्ये सौर उर्जा प्रकल्पा संदर्भात झालेल्या विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जर्मनी देशाचे व्हाइस चान्सलर रॉबर्ट हाव्यक व त्यांच्या मंत्री मंडळातील सहका-यांसमवेत या सामजस्य करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.