प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात दि. १३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या क्रिकेट या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या १० जिल्यातील ३० संघानी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे उदघाटन १३ डिसेंबर २०१९ रोजी महाविद्यालयाती प्रांगणात झाले असून या उदघाटन प्रसंगी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीर सिंग चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील हे उपस्थित होते. डॉ. महावीरसिंग चौहान यांनी सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून खेळाचे महत्व समजून सांगितले तसेच कार्क्रमाचे अध्यक्ष भारत घोगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना उदघाटनप्रसंगी मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी महाविद्यालय विळद घाट येथील प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. मधुकर खेतमाळस (संचालक कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय), प्रा. निलेश दळे (प्राचार्य कृषी महाविद्यालय), प्रा. रोहित उंबरकर (प्राचार्य कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय), प्रा. ऋषिकेश औताडे ( प्राचार्य कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय), डॉ. खर्डे (उपप्राचार्य पी व्ही पी जुनिअर कॉलेज ) व इतर शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.