राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी शिक्षण, मत्स्य व दुग्ध, कला शिक्षण या विभागांतर्गत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन-समुपदेशन आणि मुळ कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामिण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सेतू सुविधा केंद्र सुरु झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली .
अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कोड ५१३९ असून या सेतु सुविधा केंद्रामध्ये जिल्हयातील विविध भागातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिये बाबत सोय होणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरु होणेसाठी महाविद्यालयाने अर्ज स्विकृती केंद्रासाठी स्वतंत्र अद्यावत १०० संगणकांची लॅब व कौंसेलिंग हॉलची व्यवस्था केलेली आहे. अर्ज स्विकृतीच्या वेळी इयत्ता दहावी आणि बारावीचे गुणपत्रक, विद्यालय सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे तयार ठेवावी. या फेऱ्यांसाठी होणाऱ्या फ्रिज, स्लाईड व फ्लोटींग या पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये काही अडचण येत असल्यास त्यांनी प्रा. कपिल ताम्हाणे (९९६०४२४२४७), प्रा.अनिल लोंढे (९८५०२०९६४३), प्रा.प्रदिप नळे ९९६०६८८९४३, प्रा.पंकज चित्ते(९०९६३५०१०१) यांना संपर्क करावा.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा तसेच अभ्यासक्रमांशी संबंधित इतर राष्ट्रीय प्रवेश परीक्षा दिलेल्या आहेत अश्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दिनांक ०७ जून, २०१९ पासून www.mahacet.org (SAAR P०rtal: SETU Assisted Admission Registration for A.Y. 2019-20) या संकेत स्थळावर जाऊन विहित लिंकवर क्लिक करून नाव नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर स्वत: निवडलेल्या सेतू सुविधा केंद्रामध्ये पूर्वनियोजन केलेल्या वेळी भेट देऊन प्रवेश प्रक्रिया अर्ज व त्या संबंधीत आवश्यक असणारी कागदपत्रे तपासणी करून घ्यावीत. संकेतस्थळावर तसेच आपल्या लॉग इन मध्ये प्राप्त झालेल्या सूचना, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक/ शासकीय परीपत्रके यांचे नियमित अवलोकन करावे. तसेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये (CAP) शी संबंधीत वेळापत्रकाबाबत www.mahacet.org (SAAR P०rtal: SETU Assisted Admission Registration for A.Y. 2019-20) या संकेत स्थळावर भेट द्यावी.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑन लाईन अर्ज सेतु सुविधा केंद्रामध्ये भरावे व त्यानंतर सेतु सुविधा केंद्रातून कागदपत्रे तपासून घ्यावे याचा फायदा विद्यार्थी व पालकांनी घ्यावा असे अवाहन प्रवरा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी केले आहे.