गावरान बियाणे आरोग्यादाायी आहेत.या वाणांचे महत्व आणि जुन्या वाणाचे जतन करण्यासाठी वात्सल्यसिंधू बीज बँक विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच या माध्यमातून जुन्या वाणांचे जतन होण्यास मदत होईल असे प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाने सुरू केलेल्या वात्सल्यसिंधू बीज संग्रहालयाचा शुभारंभ सौ. विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी संस्थेचे शिक्षण संचालक आणि प्राचार्य डाॅ. प्रदीप दिघे, कॅम्पस संचालक डॉ. राम पवार या विभागाचे प्रमुख डाॅ. अनिल वाबळे, वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश खर्डे, प्रा. छाया गलांडे, डॉ. शांताराम चौधरी आदींसह वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. विखे म्हणाल्या की, प्रवरेच्या माध्यमातून शिक्षणासोबतच विविध उपक्रम नेहमी सुरू असतात याच माध्यमातून वासल्यसिंधू बीज संग्रहालय हा उपक्रम शेतकऱ्यांच्या करीता मार्गदर्शक ठरेलच पण भविष्याच्या दृष्टीने कृषी आणि वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्याना संशोधनासाठी खूपच उपयुक्त ठरेल.
जुन्या वाण्याचं बीज जतन करण्यासाठी सुध्दा सदर उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असे सांगतानाच या माध्यमातून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या बियाणा बरोबरच शेतकऱ्यांकडून संकलित केलेल्या बियाणाचे संग्रहालय या बीज बँकेच्या माध्यमातून विकसित करण्यात मोठी मदत होईल. जुने वाण त्याचबरोबर त्यांचा औषधी वापर याविषयीची जनजागृती होण्यास बीज बॅकेच्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन सौ.विखे यांनी केले.
प्रारंभी डॉ. आर. ए. पवार यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती देतांना वनस्पतीशास्त्र विभागाच्या माध्यमातून प्रवरा परिसरातील २५ शाळा महाविद्यालयांमध्ये औषधी वनस्पती उद्यान हा उपक्रम देखील सुरू आहे. तर डाॅ.अनिल वाबळे यांनी या माध्यमातून जुन्या वाणांचा प्रचार प्रसार आणि त्याचे जतन करण्याचं काम महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या माध्यमातून करुन या बीज बॅकेची व्याप्ती वाढणार असून यामुळे शेतक-यांना बियाणे पुरवठा करण्याबरोबरचं विद्यार्थ्याच्या संशोधनाला चालना मिळले असे डाॅ. वाबळे यांनी सांगितले.