‘निसर्गाचे संतुलन अबाधित तर मानव अबाधित’ या न्यायाने वैयक्तिक जीवन, घरची जबाबदारी, नोकरी या सर्व गोष्टी सांभाळून समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी मनात बाळगून लोणीतील तरुणानीं’झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत गोगलगाव परिसरातील शनी डोंगरावर सुट्टीच्या दिवशी १५१ वृक्षांची लागवड करून सोशल मिडीयाच्या लोभात अडकलेल्या तरुणाईला निसर्ग संवर्धनाचा वेगळा संदेश दिला.
सध्या पावसाळा सुरु आहे. या दिवसातील बहरलेला निसर्ग पाहण्यासाठी,पर्यटकांची वर्दळ सुरु होते, लहान-मोठे धबधब्यांनी निर्सगप्रेमींना भुरळ पडते. परंतु दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत असल्याने निसर्गाचा हा सगळा अनमोल ठेवाच नाहीसा होण्याची शक्यता निर्माण होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रचंड वृक्षतोड. म्हणूनचजबादार नागरिक म्हणुन निसर्गसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारताना लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये सेवेत असलेल्या सुरेश जाधव , प्रशांत काकड, निलेश चित्ते, दीपक विखे , संपत चेचरे , भगवान शिंदे, श्रीराम कदम, अंबादास मगर, गंगाराम धनवटे, महेश गायकवाड, अक्षय डोके, प्रवीण गायकवाड, नितीन ब्रम्हाने, उच्चशिक्षित तरुणांनी
शनिवार दि.१३ जुलै २०१९ रोजी गोगलगाव येथील उजाड शनिडोंगरावर दिवसभर खड्डे खोदून यात माती टाकून १५१ झाडे लावून अनोखा उपक्रम साजरा केला. या झाडांना पाणी घालण्यासाठी या तरुणांना दूरवरून पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. परंतु गोगलगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मिळालेलता या १५१ वृक्षाची लागवड पूर्ण करण्यासाठी या तरुणांमध्ये आलेले चैत्यन्य हे खरोखरच अभिनंदन करण्यास पात्र असेच होते.
निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर, झाडे लावा झाडे जगवा, त्यामुळे सृष्टीला बहर येईल, सौंदर्य वाढेल आणि शांतता लाभून तुमच्या जीवनात चैतन्य व नवा उत्साह फुलेल. असा संदेशत्यांनी दिला.
फोटो कॅप्शन :-गोगलगाव परिसरातील शनी डोंगरावर १५१ वृक्षांची लागवड करताना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सेवक….