भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघाने घेतलेल्या “सक्षम : राष्ट्रीय निबंध, पेंटिंग व प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२२” मधील “हरित और स्वच्छ उर्जा अपनाएँ, आजादी का अमृत महोत्सव मनाएँ” या संकल्पनेवर आधारित पेंटिंग स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ. १० वीमध्ये शिकणाऱ्या कु. स्नेहल व तेजल सूर्यभान तांबे या भगिणीनी “सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय पेंटिंग” हा पुरस्कार प्राप्त केला. अशी माहीती प्राचार्या दिप्ती आॅडेप यांनी दिली.
या विजयी स्पर्धेत रुपये चार हजार रोख आणि उपलब्धी प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षणांसोबतचं विविध स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले जाते.यामुळे प्रवरेतील विद्यार्थी कायमचं विविध स्पर्धेत विजयी ठरत असतात. या स्पर्धेतील सर्व विद्यार्थिनींना संगणक विभाग प्रमुख प्रा. गिरीश सोनार, श्री. जितेंद्र बोरा, श्री. सुरेश गोडगे, कु. पल्लवी पवार, कु. सोनाली मेढे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,संस्थेचे सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.