सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिन्नर नाशिक येथील सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांची इन्‌फोसिस, टी. सी. एस, कॉग्निझंट, ग्रोविंग फ्लॉवर्स, एपिटोम आणि लीग्रॅड अशा विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेली असून या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवड झालेल्या विद्यार्थ्याना पाच लाखपासून ते साडे तीन लाखांचे सरासरी पॅकेज सर्वच विद्यार्थ्यांना मिळाले आहे.