महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या चार स्वयंसेवकांची राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.
रासेयो,उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय कक्ष मुंबई व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यमाने बोरवण-धडगाव ता- अक्राणी,जि-नंदुरबार येथे ‘स्वच्छ भारत ,सुंदर भारत’ या संकल्पनेवरती राज्यस्तरीय शिबिरासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.महावीरसिंग चव्हाण यांनी निवड केलेला १६ स्वयंसेवकांचा संघ पाठविण्यात आला. सदर संघामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी येथील स्वयंसेवक चि.अनुराग देशमुख चि.हर्षल तांबे, कु.स्नेहल सहाणे,कु.अनुजा दहातोंडे यांची निवड करण्यात आली.सदर निवडीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे आणि रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. निवड झाल्यानंतर संचालक डॉ.महावीरसिंग चव्हाण यांनी स्वयंसेवकांना आणि कार्यक्रम अधीकारी यांना शिबिरांचे उद्देश आणि महत्व, शिबिराचे नियम,शिबिरदारम्यान करावयाचे कार्यक्रम आणि शिबिराचे स्वयंसेवकांसाठीचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.
सदर शिबीर हे ६ मार्च ते १२ मार्च या कालावधीदरम्यान संपन्न होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, महासंचालकाच्या सहायक सचिव सौ.सुष्मीता माने, सहसचिव भारत घोगरे, कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर, डॉ.दिगंबर खर्डे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.