प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या वस्तीगृहातील मुलींच्या आजी आजोबांचा मेळावा संपन्न प्रवरेमुळे आम्हा मुलींची चिंता नाही
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर या ठिकाणी वस्तीगृहामध्ये शिकत असलेल्या मुलींसाठी आजी आजोबा मेळावा त्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून झालेला हा आजी-आजोबा मेळावा हा प्रवर आहे मुलींच्या शिक्षणासाठी सुरक्षित असल्याची भावना आजी आजोबांनी यावेळी व्यक्त केली.
आजी आजोबांचे स्वागत गीत,लेझीम पथकडून झालेले स्वागत,शाळेतील संगीत शिकणाऱ्या मुलींनी आजी आजोबांविषयी केलेले गिते.आणि निसर्गरम्य परिसर,सोबत खास त्यांच्यासाठी आयोजित विविध खेळ यामध्ये ते चांगलेचं रमले.
आजी आजोबांचे कुटुंबात असलेले स्थान किती महत्त्वाचे आहे. अनेक आजी आजोबांनी आपले अनुभव सांगितले व आज होणाऱ्या पालक मेळाव्यासाठी आपल्याला बोलावले त्याबद्दल शाळेचे मानत बदलत्या समाजात संस्कारांची कशी गरज आहे . आजच्या काळात मुलींची सुरक्षा किती महत्त्वाची आहे आणि या सगळ्या गोष्टी कन्या मंदिर मध्ये घडत आहेत म्हणून सर्व पालक मुलींना वस्तीगृहामध्ये टाकून निश्चित आहोतं असे मत काही आजोबा व पालकांनी व्यक्त केले.प्रवरा कन्या विद्या मंदिर मध्ये अनेक विद्यार्थिनी घडल्यात आणि वेगवेगळ्या पदांवर समाजात, राजकीय क्षेत्रात मानाने काम करत आहेत याचा काही पालकांनी विशेष उल्लेख केला. वेगवेगळ्या गमतीशीर खेळांचे आयोजन केले होते त्याचा आजी आजोबांनी आनंद लुटला. अगदी वय विसरून त्यांनी या खेळामध्ये सहभाग घेतला. आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला हा कार्यक्रम घेऊन विखे पाटील परिवारांने नेहमी वेगळं काहीतरी समाजाला देत आहेत. त्यामुळेच त्यांनी सुरू केलेल्या शाळांमध्ये चांगले काम सुरू आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका विद्या घोरपडे यांनी आजी आजोबा मिळावा घेण्यामागचा उद्देश सफल झाला याचे समाधान व्यक्त केले. शाळेमध्ये घेतलेल्या उपक्रमामध्ये मुली भाग घेतात. गणेशोत्सव, नवरात्र अशा उपक्रमांमधून मुलींना चांगले संस्कार दिले जातात व खेळामधून शरीराचा व मनाचा भक्कमपणा दिला जातो.आजी आजोबा मेळावा यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, शिक्षण संचलिका लीलावती सरोदे प्राचार्य भारती कुमकर आणि विद्यालयातील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थिनींनी खूप मेहनत घेतली.
मेजर सिता शेळकेच्या कर्तबगारीचा प्रवरेलाही अभिमान!…मंत्री विखे पाटील यांनी केले अभिनंदन!
केरळ राज्यातील वायनाड येथील नैसर्गिक संकटात आपल्या कुशल बुध्दीने केवळ ३१ तासांत सेतू उभा करणा-या लष्कर सेवेतील सीता शेळके या प्रवेच्या माजी विद्यार्थीने दाखवलेल्या कर्तबगारीचा प्रवरा परीवाराला सार्थ अभिमान असल्याची भावना पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
प्रवरा अभियात्रिकी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी असलेली सिता अशोक शेळके सध्या लष्करी सेवेत आहेत. केरळ मधील वायनाड येथे पावसाने ओढवलेल्या नैसर्गिक संटकात मेजर सीता शेळके यांच्या नेतृत्वाखालील टिमने अवघ्या ३१ तासात पुलाची उभारणी करून मदत कार्यासाठीचा मार्ग सुकर करून दिला.मेजर सीता शेळके यांच्या टिमने दाखवलेल्या तत्परतेने पुरग्रस्तांना मोठी मद्दत झाली.
या सर्व प्रक्रीयेत आपले कर्तृत्व दाखवणारी सीता शेळके ही प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची माजी विद्यार्थीनी असून संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१० साली मॅकेनिकल विभागातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
मोठ्या प्रमाणात वायनाड येथे झालेल्या पावसाने आसपासची चार गावे नाहीशी झालेली होती. आणि मुख्य म्हणजे या गावांशी संपर्क करण्यासाठी असलेला नदीवरील जुना पूल नष्ट झाला होता. या गावांतील बचावलेल्या नागरीकांना मदत पोहोचवण्यासाठी पुलाची उभारणी करायला पाहिजे होती.
ज्या दिवशी ही दुर्घटना घडली आणि लष्कराला माहिती मिळाली त्याच दिवशी बंगळूरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपने आपले सत्तर जवान आणि पुलासाठी अत्यावश्यक साहित्य सुमारे २० गाड्यांमध्ये भरून रवाना केले. या तुकडीचे नेतृत्व या तुकडीतील एकमेव महिला अधिकारी मेजर सीता अशोकराव शेळके यांच्याकडे होते.
सिता शेळके यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे आणि त्यांच्या टिमच्या कार्याचा मोठा अभिमान प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेस असून, देश सेवे बरोबरच लष्काराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अतिशय धैर्याने बजावणार्या सीता शेळके आणि त्यांच्या टिमचे मंत्री विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहै.
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिरचे यश
पुणे येथील शिवछत्रपती स्टेडियम बालेवाडी येथे झालेल्या सुब्रतो मुखर्जी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीच्या १७ वर्षे वयोगटाच्या संघाने नाशिक संघाचा ४-० ने पराभव करत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
प्रवरेच्या कृषी व संलग्नित महाविद्यालयांना आएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त
प्रवरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर संस्थेचा नावलौकिक मिळवला-सौ शालिनीताई विखे पाटील
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्याकोल्हार येथील प्रवरा हायस्कूल या सीबीएसई शाळेच्या ४८ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात सौ.विखे बोलत होत्या. यावेळी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे पाटील,स्कूल च्या माजी विद्यिर्थीनी सौ. अनिता हरिभाऊ खर्डे, सौ.कोमल वडीतके,अशोक असावा, संभाजी देवकर,प्रशांत खर्डे, गोरख खर्डे,आबासाहेब राऊत ,प्रा नंदकुमार दळे,सुनील शिंदे, प्राचार्य सुधीर मोरे,यांच्या सह सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सौ.विखे पाटील म्हणाल्या,सी बी एस ई चा अभ्यासक्रम नुकताच सुरू केलेल्या या शाळेने अल्पावधीतच उत्तम असे यश संपादन केले आहे.मुलांनी माजी विद्यार्थ्यांना आदर्श म्हणून ठेवावे. या शाळेचे विद्यार्थी देश परदेशामध्ये आपले आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करीत आहे. कोल्हार सारख्या ग्रामीण भागामध्ये प्रवरेने अत्यल्प फिमध्ये सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध करून दिलेले आहेत.शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी मेहनत घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
केले.
शाळेचे माजी विद्यार्थिनी शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र अनिता खर्डे आणि बँक ऑफ इंडियाच्या कृृषि अधिकारी कोमल वडीतके यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत,जिद्द त्याचप्रमाणे अदनाधारकपणा या गुणांचा आत्मसात करण्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मिताली अंबुलगेकर आणि प्रा. प्रिया कडसकर यांनी केले. कु. संस्कृती पानसरे हिने मानले.
वात्सल्य सिंधू बीज बॅक, डॉ.विखे पाटील महाविद्यालयाचा उपक्रम
गावरान बियाणे आरोग्यादाायी आहेत.या वाणांचे महत्व आणि जुन्या वाणाचे जतन करण्यासाठी वात्सल्यसिंधू बीज बँक विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच या माध्यमातून जुन्या वाणांचे जतन होण्यास मदत होईल असे प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाने सुरू केलेल्या वात्सल्यसिंधू बीज संग्रहालयाचा शुभारंभ सौ. विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी संस्थेचे शिक्षण संचालक आणि प्राचार्य डाॅ. प्रदीप दिघे, कॅम्पस संचालक डॉ. राम पवार या विभागाचे प्रमुख डाॅ. अनिल वाबळे, वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश खर्डे, प्रा. छाया गलांडे, डॉ. शांताराम चौधरी आदींसह वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. विखे म्हणाल्या की, प्रवरेच्या माध्यमातून शिक्षणासोबतच विविध उपक्रम नेहमी सुरू असतात याच माध्यमातून वासल्यसिंधू बीज संग्रहालय हा उपक्रम शेतकऱ्यांच्या करीता मार्गदर्शक ठरेलच पण भविष्याच्या दृष्टीने कृषी आणि वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्याना संशोधनासाठी खूपच उपयुक्त ठरेल.
जुन्या वाण्याचं बीज जतन करण्यासाठी सुध्दा सदर उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असे सांगतानाच या माध्यमातून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या बियाणा बरोबरच शेतकऱ्यांकडून संकलित केलेल्या बियाणाचे संग्रहालय या बीज बँकेच्या माध्यमातून विकसित करण्यात मोठी मदत होईल. जुने वाण त्याचबरोबर त्यांचा औषधी वापर याविषयीची जनजागृती होण्यास बीज बॅकेच्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन सौ.विखे यांनी केले.
प्रारंभी डॉ. आर. ए. पवार यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती देतांना वनस्पतीशास्त्र विभागाच्या माध्यमातून प्रवरा परिसरातील २५ शाळा महाविद्यालयांमध्ये औषधी वनस्पती उद्यान हा उपक्रम देखील सुरू आहे. तर डाॅ.अनिल वाबळे यांनी या माध्यमातून जुन्या वाणांचा प्रचार प्रसार आणि त्याचे जतन करण्याचं काम महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या माध्यमातून करुन या बीज बॅकेची व्याप्ती वाढणार असून यामुळे शेतक-यांना बियाणे पुरवठा करण्याबरोबरचं विद्यार्थ्याच्या संशोधनाला चालना मिळले असे डाॅ. वाबळे यांनी सांगितले.
प्रवरेच्या बी.टेक बायोटेकच्या सात विद्यार्थ्यांची फार्मा कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी बी.टेक बायोटेक महाविद्यालय, लोणी येथील अंतिम वर्षातील सात विद्यार्थ्यांची मॅक्लिऑड्स फार्मास्युटिकल्स या नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब घोरपडे यांनी दिली. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील वरिष्ठ महाविद्यालय, लोणी येथे नुकत्याच झालेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये प्रसाद नलावडे, हरीश शिरसाठ, सुजित सरतापे, रोहित संगपाल, गिते अभिजित, सुरज शिंदे, अभीषेक दिघे या सात विद्यार्थ्यांची निवड झाली.
प्रवरेच्या इन्स्टिट्युट ऑफ एग्रीकल्चर अँड डेअरी सायन्सेच्या चार विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड
लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे इन्स्टिट्युट ऑफ एग्रीकल्चर अँड डेअरी सायन्सेस, लोणी येथील ४ विद्यार्थ्यांची युनायटेड बायो एनर्जी, जुन्नर पुणे या कंपनी मध्ये प्रसाद पलघडमल, प्रतीक दुबे ,प्रसाद खर्डे, क्षितिज पठारे यांची मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.
बारावीच्या निकालात प्रवरेची गुणवता कायम!
जिल्ह्याच्या शैक्षणिक परंपरेचा आलेख उंचावत असल्याचा अभिमान -ना.विखे पाटील
संस्थेच्या १० कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इयत्ता बारावीच्या निकालात संस्थेने आपली शैक्षणिक गुणवता कायम राखली असून, संस्थेच्या १० महाविद्यालयांनी निकाल १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही राखली आहे. विज्ञान १० ,कला २ वाणिज्य शाखेतील ४ तर किमान कौशल्य अभ्यासक्रम शाखेतील २ महाविद्यालयांचा समावेश आहे.,प्रवरेच्या इंग्रजी माध्यमांच्या तीनही शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या १७ कनिष्ठ महाविद्यालाने आपली निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी २५६० विद्यार्थी पैकी २४६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेचा कला शाखेच्या १२ महाविद्यालयाचा निकाल ८५.१३ लागला असून प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी आणि कै.जनार्दन काळे पाटील विद्यालय चिंचोली या कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के लागला असून कला शाखेतून ४१७ पैकी ३५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेच्या महाविद्यालयांचा निकाल ९८.९२ टक्के लागला असून मराठी माध्यमातील छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय पाथरे, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय बाभळेश्वर,डाॅ.बाबासाहेब आंबडेकर कनिष्ठ महाविद्यालय,भगवतीपूर या तीन तर इंग्रजी माध्यमातील प्रवरा पब्लीक स्कूल प्रवरानगर, प्रवरा सेंट्रल पब्लीक स्कुल प्रवरानगर,पद्मश्री डाॅ.विखे पाटील सैनिकी स्कुल,प्रवरानगर या तीनही महाविद्यालयांचा १०० टक्के लागला असून, १८५१ पैकी १८३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल हा ९४.९२ टक्के लागला असून डाॅ.बाबासाहेब आंबडेकर महाविद्यालय भगवतीपूरचा निकाल १०० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून २३६ पैकी २२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर किमान कौशल्य शाखेचा निकाल ९६.४३ टक्के लागला असून प्रवरा कन्या विद्या मंदीरच्या कनिष्ठ महाविद्याल लोणी यांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वानीच केलेल्या सांघिक प्रयत्नामुळे अहील्यानगरची निकालाची परंपरा कायम राखली गेली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा महमंडळाच्या निकालाची आकडेवारी पाहीली तर आपला जिल्हा गुणवत्तेत तिसर्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ जिल्ह्याच्या शैक्षणिक परंपरेचा आलेख उंचावत आहे याचा सर्वानाच अभिमान असल्याचे नमूद करून जिल्ह्यातील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौतुक केले असून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे संस्थाचालक पालक यांचेही अभिनंदन केले आहे.
प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या ११ विद्यार्थिनींना भारत सरकारची संस्कृत शिष्यवृत्ती…
भारत सरकारच्या संस्कृत संवर्धन योजनेअंतर्गत केंद्रीय संस्कृत विश्व विद्यालयाकडून लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या ११ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या भारती कुमकर यांनी दिली.
संस्कृत भाषा आणि शिक्षणाच्या सर्वांगीण संवर्धन आणि विकासासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय संस्कृत विद्यापीठामार्फत बहुविध केंद्रीय योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या एकूण ११ विद्यार्थिनींना प्रत्येकी रु. ५००० एवढी गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना संगणक विभाग प्रमुख प्रा. गिरीश सोनार यांनी सांगितले की संस्कृतला ज्ञान प्रणाली म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये गणित, तत्त्वज्ञान, व्याकरण, संगीत, राजकारण, वैद्यकशास्त्र, वास्तुशास्त्र, धातूशास्त्र, नाटक, कविता, कथाकथन यांचा मोठा खजिना आहे. म्हणून संशोधनाच्या माध्यमातून संस्कृत शिक्षणात गुणात्मक बदल घडवून आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. ही शिष्यवृत्ती प्राप्त होण्यासाठी संस्कृत शिक्षिका निशाली शेजूळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांच्यासह विद्यार्थ्याची राज्य एक्वाथोलोन स्पर्धेमध्ये रौप्य पदक
डोंबिवली ठाणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेतर्फे आयोजित राज्य एक्वाथोलोन स्पर्धेमध्ये मास्टर गटामध्ये ( २०० मीटर स्विमिंग आणि दोन किलोमीटर धावणे ) प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांनी २०० मीटर स्विमिंग आणि दोन किलोमीटर धावणे हे अंतर २३ मिनिट सहा सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण करून रोप्य पदक पटकावले त्याचबरोबर अभिमानाची बाब म्हणजे प्रवरा अभियांत्रिकीच्या प्रतीक चिंचाने याने ओपन कॅटेगिरी मध्ये ७५० मीटर स्विमिंग आणि पाच किलोमीटर धावणे हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण करून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामधील ओपन कॅटेगिरीच्या खेळाडूंमध्ये नववे स्थान पटकावले त्यासोबतच प्रवरा अभियांत्रिकीच्या प्रथमेश जाधव, जतिन लाल तसेच प्रवरा तंत्रनिकेतनच्या निसर्ग गुगले यांनी ओपन कॅटेगिरी मध्ये ७५० मीटर स्विमिंग आणि पाच किलोमीटर धावणे हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण करून पहिल्या १५ खेळाडूंमध्ये आपले स्थान पटकावले.
खेळाडूंना प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे,संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे पाटील, जलतरण प्रशिक्षक अकील शेख यांचे मार्गदर्शन लाभले
या यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीचे सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ , संस्थेचे अतांञिकचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालक प्रा. लीलावती सरोदे, सहशिक्षण अधिकारी प्रा. नंदकुमार दळे,संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे पाटील, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय राठी,महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सदस्य तसेच ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी पंच श्री.अभय देशमुख, आदींनी अभिनंदन केले आहे
