काव्य मैफिल २०२३

काव्य मैफिल २०२३

सन्मा. नामदार श्री राधाकृष्णजी विखे पा. (महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या संकल्पनेनुसार संस्था पातळीवर आपण विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांमधील काव्य प्रतिभा आणि साहित्यिक प्रतिभा यांना चालना मिळावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मध्ये नव्यानेच काव्यमैफील हा उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी कवी संमेलन व काव्यवाचन या दोन स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कविसंमेलन व काव्यवाचन हे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत.

यासाठी खालील प्रमाणे आयोजन समितीचे गठन करण्यात आलेले आहे :

अध्यक्ष- सौ. लीलावती सरोदे

सदस्य- श्री. गिरीश सोनार

श्रीम. भारती देशमुख

श्री. यशवंत पुलाटे

श्री. सुनिल ब्राम्हणे

डॉ. राजेंद्र कोबरणे

शिक्षक काव्य मैफिलीत भाग घेऊ शकतील, परंतु स्पर्धा केवळ विद्यार्थ्यांसाठी असेल.

सादरीकरणासाठी विद्यार्थी तसेच शिक्षकांकडून ऑनलाइन रजिस्ट्रेशनद्वारेच प्रवेशिका स्वीकारल्या जातील.

 

1)सादरीकरणासाठी निवडलेले काव्य केवळ मराठी भाषेतील असावे.

2) काव्य स्वरचित असावे.

3)काव्य अभिजात भाषेचा व कलेचा दर्जा राखणारे आणि सौजन्यपूर्ण असावे .

4)भक्तीगीत, भावगीत, निसर्ग वर्णनात्मक कविता, विनोदी कविता, गझल, मुक्त छंद कविता, अभंग, अंगाईगीत, विडंबनात्मक कविता, समरगीत, पोवाडा, बालगीत, बडबडगीत अशा विविध प्रकारातील काव्य सादर करता येईल.

5) काव्य हे पूर्वग्रह दूषित राजकीय, सामाजिक, धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारे नसावे तसेच प्रक्षोभक, अश्लील, संदर्भहीन, कोणावरही टीका करणारे नसावे किंवा कोणाच्याही भावना दुखावणारे नसावे याची काटेकोर दक्षता घेतली जावी.

6) स्वरचित कवितेचे किंवा काव्यवाचनाचे पुढील निकषांच्या आधारे परीक्षण केले जाईल : आशय, गेयता, रसबद्धता, छंदबद्धता, कवितेची निवड, अभिनिवेश, सादरीकरण, चढ-उतार व शब्दोच्चार.

7)फॉर्म भरत असताना दिलेल्या सूचनांचा व्यवस्थित अवलंब करावा.

8)स्वरचित कविता किंवा काव्यवाचन हे स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून ऑडिओ फाईल अपलोड करावी. आवाज हा स्पष्ट तसेच सुश्राव्य असावा.

9)फाईल ही व्हिडिओ किंवा इतर कुठल्याही स्वरूपात अपलोड होणार नाही याची दक्षता घ्यावी.

10)स्पर्धेसाठी पाठविलेले काव्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे संपूर्ण अधिकार आयोजन समितीकडे असतील.

11)वरील सर्व प्रक्रियेमध्ये आयोजन समितीचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल.

12)ऑनलाइन नोंदणीशिवाय इतर कोणत्याही प्रकारे प्रवेशिकांचा स्वीकार केला जाणार नाही.

13)या परिपत्रकासोबत प्राप्त झालेल्या गुगल फॉर्मद्वारे स्पर्धेसाठी व सादरीकरणासाठी प्रवेशिका सादर करण्यात यावी.

14)प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत सोमवार दि. २७ फेब्रुवारी २०२३ स. ९.०० पर्यंत असेल.

15)कार्यक्रमाची तारीख, वेळ व ठिकाण नंतर कळविण्यात येईल.