इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग क्षेत्रात प्रसिद्ध व नावलौकिक असलेल्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भरघोस पगाराच्या नोकऱ्या प्राप्त झाल्या असून, मागील सलग तीन वर्षांपासून या विभागातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.
महाविद्यालयामध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे पुणे येथील प्राज इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सौरभ शिंदे या विद्यार्थ्याला वार्षिक ४ लाख रुपये तर, नाशिक येथील इमर्सन एक्स्पोर्ट इंजिनीरिंग या कंपनीमध्ये अजय बाबर या विद्यार्थ्याला वार्षिक ३ लाख ७५ हजार रुपये पगाराचे प्याकेज निकलापूर्वीच मिळाले आहे. प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना नोकऱ्या प्राप्त होण्यासाठी अनेक नामांकित कंपन्याबरोबर करार केले असल्याचे सांगताना प्राचार्य डॉ गुल्हाने म्हणाले की, या आधीही इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागाच्या किरण धायगुडे, शार्दूल खपके, राहुल नेहे विद्यार्थ्यांची वर्चुसो प्रोजेक्ट्स अँड इंजिनीरिंग लिमिटेड पुणे तर पूजा घोरपडे, ऐश्वर्या धावणे, अभिमन्यू खेडकर, सौरभ शिंदे या विद्यार्थ्यांची टेकलोगोज ऑटोमॅशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत.
इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत कडू म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग या विभागातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले असून सध्या जगात तंत्रज्ञानात चालू असलेल्या बदलामुळे भविष्यात इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीत मोठी मागणी असणार आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे पदमश्री राहीबाई पोपेरे, ज़िल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, सहसचिव श्री. भारत घोगरे , तांत्रिक संचालक डॉ. के टी व्ही रेड्डी, प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर, डॉ. आण्णासाहेब वराडे, प्रा. वर्षा गायकवाड, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले