मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस

आजच्या काळात भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना तोंड देत असून त्याला या समस्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी व त्यातून मातीचे ऋण फेडण्याची किमया ही कृषी पदवीधारकांमध्ये असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व कृषी महाविद्यालय यांचा सयुंक्त विद्यमाने आयोजित  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाव्हूणे म्हणून ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी सौ.ललिता सबनीस, महाविद्यालयाच्या कार्यकारी व्यवस्थापन समितीचे सदस्य कृषीभूषण बन्सी पाटील तांबे, कृषीभूषण सौ. सुजाता  थेटे, विखे पाटील महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. अण्णासाहेब तांबे, पालक प्रतिनिधी श्री सुभाष केदार, संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, माजी विद्यार्थी डॉ. निलेश बनकर, योगेश फडतरे, साईनाथ जोंधळे व धवलराज पवार आदी मान्यवर  उपस्थित होते.

प्रारंभी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कृषी संलग्नित महाविद्यालयांचा वार्षिक प्रगतीचा अहवाल सादर केला तसेच  कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिकेच्या (स्मरणीचे) प्रकाशनाचे प्रकाशन या वेळी मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, सहकारातून मातीला गोडवा देणाऱ्या विखे कुटुंबातील चौथी पिढी राजकारण व समाजकारण यातून शेतकऱ्याच्या उद्धारासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. आजच्या काळात रासायनिक शेती चांगली की सेंद्रिय शेती यावर वाद न करता शेती उत्पादनातून शेतकऱ्याला अर्थार्जन व त्याच बरोबर सकस आहार कसा देता येईल यावर कृषी शिक्षणाद्वारे संशोधन होणे गरजेचे आहे. कृषी पदवीधर मातीशी जोडला असल्याने मातीचे ऋण फेडण्याची किमया ही फक्त त्याच्यातच असू शक्यते  असे ते म्हणाले

आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी समाज्यामध्ये असलेल्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी पुढील काळात प्रत्यक्ष अनुभवातुन शिक्षण घ्यावे. बीजमता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या कार्यातून प्रेरित घेऊन आपल्या पारंपरिक धान्य व भाजीपाला यांचा प्रचार प्रसार करून त्याद्वारे शेतकऱ्यांना व ग्राहकांना फायदा कसा होईल यावर लक्ष देण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, आणि कमवा व शिका योजनेत विशेष कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते  पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सूत्रसंचालन विक्रम पासले आणि प्रा. श्रद्धा रणपिसे यांनी केले तर प्रा. रमेश जाधव यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन:- वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ. श्रीपाल सबनीस, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, सौ.ललिता सबनीस, कृषीभूषण बन्सी पाटील तांबे, कृषीभूषण सुजाता थेटे, उप-प्राचार्य डॉ. अण्णासाहेब तांबे, पालक प्रतिनिधी सुभाष केदार, कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य निलेश दळे, प्राचार्य रोहित उंबरकर, प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्राचार्य अरुणा थोरात, माजी विद्यार्थी डॉ. निलेश बनकर, योगेश फडतरे, साईनाथ जोंधळे व धवलराज पवार आदी.