मुंबई येथे संकरॉक ते गेट वे ऑफ इंडिया अशी पाच किलोमीटर अंतराची सागरी जलतरण स्पर्धेत प्रवरा कन्या विदया मंदिरच्या जलतरणपटूंनी लक्षवेधक कामगिरी बजावताण दोन गोल्ड मेडल मिळविले असल्याची माहिती प्राचार्या सौ. भारती कुमकर यांनी दिली. जलतरण तलावात प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थिनींनी थेट समुद्रात झेप घेतल्याने त्यांचे प्रवरा परिसरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य ऍमेच्युअर ऍक्वॅटिक असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या या स्पर्ध्येमध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या इयत्ता पाचवी मधील कु. साफिया पठाण आणि इयत्ता आठवी मधील कु. सुप्रिया अपसुंदे या जलतरणपटूंनी पाच किलोमीटर अंतराचा थरार अनुभवताना गोल्ड मेडल मिळविले तर,इयत्ता चौथी मधील कु. द्रुष्टी मोरे,इयत्ता पाचवी मधील कु.सायली राऊत, इयत्ता आठवी मधील कु.प्रियांका शितोळे इयत्ता नववी मधील कु.साक्षी शिंदे या विद्यार्थिनींनी प्रमाणपत्र मिळविले. या स्पर्धेत राज्यभरातून जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. खेळाडूंच्या जीवरक्षणासाठी स्पीड बोड, जीवरक्षक, डॉक्टर, पानबुडे आदी तैनात करण्यात आलेले होते. जलतरण कोच सुचित्रा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्वीसुद्धा सागरी जलतरण स्पर्ध्ये मध्ये प्रवरानगरच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन चमकदार कामगिरी केलेली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात,कॅम्पस संचालिका सौ. लीलावती सरोदे, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.