लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी प्राध्यापक सिताराम वरखड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मागील दोन वर्षापासून करोना परिस्थिती मुळे विद्यार्थी खेळापासून वंचित राहिलेले होते . विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल इंटरनेट टीव्ही या सारख्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि त्याचा एकूण परिणाम विद्यार्थ्यांच्या शरीरावर मनावर जाणवत होता. या सर्व बाबी मधून सुटका करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मैदानावर आणणे अतिशय गरजेचे होते. या मैदानी स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी 100 मीटर ,200 मीटर धावणे ,400 मीटर धावणे 100 मीटर , 4 रिले स्पर्धा उंच उडी लांब उडी क्रीडा प्रकारामध्ये आपले नैपुण्य दाखवले . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक वरखड म्हणाले विद्यार्थ्यांची शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती उत्तम राहण्यास मदत होते विद्यार्थ्यांच्या शरीरावर डोळ्यांवर मनांवर होणाऱ्या परिणामांपासून केवळ खेळच मुक्तता देऊ शकतो . खेळ आपणास व्यक्तिमत्त्व विकासामध्ये कष्ट करण्याची वृत्ती इत्यादी गुण निर्माण करण्यास मदत करतो . स्पर्धेची सुरुवात कोल्हार भगवतीपुर येथील भगवती मातेच्या मंदिराजवळ क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आली . स्पर्धेचे सूत्रसंचालन तन्वी कडू आणि आणि श्रावणी थेटे यांनी केले तर पाहुण्यांची ओळख गुण राका हिने करून दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी केले .तर निशा मुथा हिने सर्वांचे आभार मानले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे क्रीडाशिक्षक कबीर शेख , ए.सी. कडू अमोल म्हस्के , सुरेश जाटे संदीप आहेर इत्यादी परिश्रम घेतले.