विजय दिन साजरा

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून लोणी येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी विद्यालयामध्ये कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यगाथा आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे विविध कार्यक्रम आयोजित करून विजय दिन साजरा करण्यात आला असी माहिती प्राचार्य सुधीर मोरे यांनी दिली.            

प्रारंभी भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला़. विद्यालयाचे माजी सैनिक डी. एस निबे यांनी. कारगिल युध्दाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. हरेश भांडारकर आदर्श रठोड , भूषण पारीख यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. प्रथमेश साळुंके आणि अनुराग राऊत यांनी “चिठ्ठी अति है, या गीताद्वारे देशभक्तीपर भावना व्यक्त करून उपस्थितांची माने जिंकली. तसेच ऋषिकेश शिंदे,जयदीप दुशिंग, अवधूत गिमावकर यांनी देशभक्ती बात मार्गदर्शन केले.        

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सैनिकांच्या मुलांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देताना. त्यांनीही  वडिलांचा वारसा पुढे चालवावा असी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.सूत्रसंचालन प्रा. राजेश माघाडे आणि प्रा. रमेश दळे यांनी केले. यावेळी विद्यालयातील एन सी.सी. छात्रांना प्रशिक्षण देणारे ५७ महाराष्ट्र बटालियनचे सुबेदार सुरेंद्रसिंग आणि हवालदार गौतम जोशी यांचाही सत्कार करण्यात आला. कारगिल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याची शौर्यगाथा दाखविणारा ‘एल.ओ सी (लाईन ऑफ कंट्रोल)’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी विद्यालयामध्ये कारगिल विजयी  दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम सादर करताना विदयार्थी.