भारताच्या आर्थिक विकासामध्ये आर्किटेक्चरर यांचे योगदान मोठे असून, आंतरराष्ट्रीय स्पर्ध्येमध्ये आता आर्किटेक्चररना संधीची खऱ्या अर्थाने सुरुवात असून या शाखेमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थीच उद्याचे आर्किटेक् बनून इतिहास घडविणार आहेत असे प्रतिपादन प्रशांत देशमुख असोसिएटचे प्राचार्य श्री प्रशांत देशमुख यांनी केले.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कॉलेज मध्ये प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि पालकांना आर्किटेक्चर महाविद्यालयामधील सुविधांची माहिती व्हावी या साठी आयोजित केलेल्या विद्यार्थी -पालक आणि व्यवस्थापनाच्या एकत्रित मेळाव्यात श्री प्रशांत देशमुख बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे,प्रवरा अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,रजिस्टार भाऊसाहेब पानसरे, प्रा. अनुराग दोशी, प्रा. श्रीकांत निकम,प्रा. दिपीका आरबट्टी, प्रा. कपील बुऱ्हाडे,प्रा. सुरेंद्र पवार,प्रा. सोनाली चासकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्या राजेश्वरी जगताप यांनी स्वागत भाषणात महाविद्यालयामध्ये ऊपलब्ध सुविधा,विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाचा आलेख सादर केला.
ना. सौ. विखे पाटील म्हणाल्याकी,आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारताना ज्या ज्या अडचणी आल्या त्या येणाऱ्या पिढीला जाणवू नये म्हणून पदमश्री विखे पाटील यांनी शिक्षणाचा पाया घातला ग्रामीण भागातील मुलांना विविध शैक्षणनिक सुविधा निर्माण व्हाव्यात या साठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी मोठा विस्तार केला. आज ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या सर्व सुविधा खेड्यातच निर्माण झाल्या असून जागतिक पातळीवर अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करीत आहेत. नवीन आणि वसतिगृहामढील वातावरणाशी जुळवून घेत अवास्तव खर्च आणि मोबाईलचा वापर या वर नियंत्रण विद्यार्थ्यांनी शिक्षण हेच उदिष्ट समोर ठेऊन अभ्यास करावा असे सांगताना पाहिजे त्या शैक्षणिक सुविधा साठी हट्ट धरणाऱ्या विदयार्थ्यांच्या गरज पूर्ण करण्यास शिक्षक आणि व्यवस्थापन नाकीयच तत्पर असेल असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी या वर्षी पहिल्या वर्षांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि पालक मोट्या संख्येने उपस्थित होते. श्री देशमुख यांनी दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
चौकट :- पुरंदर येथे होणाऱ्या नियोजीत विमानतळा साठी संपादित केलेल्या जमिनी मध्ये काही एतीहासिक वास्तु असून या वास्तूंचे मालक सध्या परदेशामध्ये स्थायिक आहेत. मात्र हा एतीहासिक ठेवा जतन करण्याची आवशकता असुन,या वास्तूंची देखभाल, संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी प्रवरेच्या आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुढाकार घ्यावा असा प्रस्ताव ठेवताना, हा एतीहासिक ठेवा जतन करण्या याबाबत सरकाने निर्णय घ्यावा साठी आपण पुढाकार घेऊ असे श्री प्रशांत देशमुख यांनी या कार्यक्रमात सांगितले.
फोटो कॅप्शन :-लोणी येथील प्रवरा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कॉलेज मधील प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि पालकांना आर्किटेक्चर महाविद्यालयामधील सुविधांची माहिती व्हावी या साठी आयोजित केलेल्या विद्यार्थी -पालक आणि व्यवस्थापनाच्या एकत्रित मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री प्रशांत देशमुख,सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रा. दिगंबर खर्डे, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, भाऊसाहेब पानसरे, प्रा. अनुराग दोशी, प्रा. श्रीकांत निकम,प्रा. दिपीका आरबट्टी, प्रा. कपील बुऱ्हाडे,प्रा. सुरेंद्र पवार,प्रा. सोनाली चासकर आदी.