प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये क्राँस्- कंन्ट्री स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या असल्याची माहिती प्राचार्य सयाराम शेळके यांनी दिली.
वेगवेगळया हाऊसधील ३७६ विदयार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. वेगवेगळया तीन वयोगटात मुलांच्या व दोन वयोगटात मुलींच्या यास्पर्धा झाल्या. एकूण ४८ विदयार्थ्यीनीनी सहभाग घेतला.धावण्याच्या स्पर्ध्ये मध्ये मुलांमध्ये रोहीत सोरे, प्रविण भोये, तेजस कापडनीस व मुलींमध्ये प्राप्ती शेळके, समृदधी शेळके यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केले.तसेच सिनिअर व ज्युनिअर वयोगटामध्ये नेताजी हाऊस व सबज्युनिअर वयोगटामध्ये तानाजी हाऊस् व मुलींमध्ये एस.पी. व तानाजी हाऊसने यश संपादन केले.तसेच आय.पी.एस.सी. मेंबर शीप असलेल्या प्रवरा पब्लिक स्कूलने इंदोर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चुतर्थ क्रमांक मिळवला. आय.पी.एस.सी आयोजित१७ वर्ष मुले या वयोगटातील सदर स्पर्धा ‘इमराल्ड हाईटस इंटरनॅशनल स्कूल’ इंदारे या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत देशातील एकूण दहा संघ सहभाग झाले होते. अटीतटीच्या व रोम हर्षक झालेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूल चौथ्या स्थानावर राहिले.१७ वर्षे वयोगटातील या संघाचे नेतृतव दर्शन सोळंके यांनी केले तर चेतन पाटील, संकेत कोरडे, नितीन दिवे, दर्शन गांगुर्डे या खेळाडूनंनी अतिशय चांगले प्रदर्शन केले.
स्पर्धेकांचे शाळेचे संचालक त कर्नल डॉ . के. जगन्नाथन, उपप्राचार्य श्री.के.टी.आडसूळ व श्री.एम.ई.जोसेफ यांनी अभिनंदन केले. यशस्वी स्पर्धेकांना शाळेचे क्रिडा शिक्षक श्री. जाधव डी. के., श्री.शेख कदीर, श्री. कडसकर किरण, श्री.दळे प्रतिक,श्री. आसिफ खान,श्री.सुरज मारावि यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो कॅप्शन:- प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये क्राँस्- कंन्ट्री स्पर्ध्येमध्ये सहभागी झालेले खेळाडू