भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनद्वारा सुरु असलेल्या एस.टी. व एस. सी. स्कील डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रासाठी विविध कौशल्य व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाचा चांगला उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळविण्या करिता होणार असल्याचे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी केले.
लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच एस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. या वेळी पुणे येथील प्रशिक्षण ट्रेनिंग हे इम्पॅक्टचे प्रशिक्षक श्री. पंकज मित्तल तसेच नाशिक येथील फ्लाय हाय अप्टिट्यूड् ट्रेनिंग सर्विसेस चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओंकार जगदाळे,पूजा सनार, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर प्रा. अब्दुल हमीद अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणाअंतर्गत विद्यार्थांना कम्युनिकेशन स्कील, रिझ्युम रायटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्याच्या मुलाखतीची तयारी, ग्रुप डिस्कशन व ऍप्टिट्यूड टेस्ट अश्या विविध प्रकारच्या गोष्टींचे कौशल्य प्राप्त करून देण्यात आले.त्याचा उपयोग रोजगाराच्या नवीन संधीकरिता होणार आहे.असल्याचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले तसेच यापूर्वीही अशापद्धतीचा पंधरा दिवसांचे प्रशिक्षण सीयु-सकसिड संस्थेकडून सर्व विभागांच्या विभागप्रमुखांच्या साहाय्याने घेण्यात आल्याचे ते म्हणाले. सदर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी प्रा. निलेश कापसे, प्रा. लक्ष्मण लहामगे, प्रा. सचिन अनाप, प्रा. स्वप्निल बंगाळ ,प्रा. दिबा आफ्रीन अन्सारी, प्रा. अर्चना पवार यांनी परिश्रम घेतले.