गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन

गुणवत्ता असून देखील केवळ योग्य सादरीकरण करता येत नसल्याने ग्रामीण भागातील मुलीना अपेक्षित ध्येयप्राप्त करण्यास अडचणी येतात असे सांगताना,विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि अवगत कलागुणांचा विकास करणाऱ्या विविध सुविधा प्रवरे मध्ये ऊपलब्ध आहेत. या सुधींचा उपयोग  करून मुलींनी चंद्राला गवसणी घालण्याचे लक्ष ठेवले तर, तारे तरी नक्कीच हाती लागतील असे प्रतिपादन अमळनेर येथील प्रताप ऑटोनॉमस महाविद्यालयातील प्राध्यपिका सौ. मोनाली परजणे-पाटील यांनी केले.

लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून  सौ. मोनाली परजणे-पाटील बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्येक्षतेखाली झालेल्या या समारंभासाठी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय.एम.जयराज,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर,प्रवरा गर्ल्स एजुकेशन कॅम्पसच्या संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडिया स्कुलच्या प्राचार्या सौ. संगिता देवकर, प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या प्राचार्य सौ.भारती कुमकर, गृहविज्ञान विभागप्रमुख सौ. कांचन देशमुख,संगणकशास्र विभागप्रमुख सौ. राजश्री नेहे-तांबे, महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. रेखिता वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर यांनी प्रास्ताविक तर, उपप्राचार्या सौ. अनुश्री खैरे-दुबे यांनी वार्षिक शैक्षणिक प्रगतीच्या अहवालाचे वाचन केले. तसेच प्रा. अर्चना घोगरे यांनी शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळविलेल्या आणि प्रा. डॉ. उत्तम अनाप क्रीडा क्षेत्रामध्ये तालुका पातळीपासून राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींच्या नावाची घोषणा केली. संगणक विभागातील कु. कोमल मेधने आणि  गृहविज्ञान विभागातील कु. उमा खरे या विद्यार्थनींना या वर्षीच्या आदर्श विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले.

सौ. शालिनीताई विखे पाटील मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि,विद्यार्थिनींमध्ये जीवनाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून होत असल्यानेच आज अनेक विद्यार्थीदेश विदेशात महत्वाच्या क्षेत्रामध्ये उत्क्रुष्ट काम करीत आहेत असे सांगताना, गृहविज्ञान विभागामध्ये अनेक संधी असून, द्रुष्टी असेल त्या प्रमाणे सृष्टी दिसत असल्याने विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबरच संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या सुविधांचा पुरेपूर उपयोग करून घेताना,ज्ञान मिळविण्यासाठी हट्ट धरावा असे आवाहन त्यांनी केले. शेवटी प्रा. जया डबरासे यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन ;- लोणी येथे गृहविज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण प्रसंगी  जि प माजी अध्यक्षा ना शालिनीताई विखे पाटील,माजी विद्यार्थ्यांनी मोनाली कृष्णराव परजणे पाटील अमळनेर,प्रवरा अभिमत विद्यपीठाचे कुलगुरू डॉ जयराज,प्रा डॉ हरिभाऊ आहेर,प्राचार्य डॉ शशिकांत कुचेकर,उपप्राचार्य डॉ अनुश्री खैरे,संचालिका,लीलावती सरोदे,संगीता देवकर.