डॉ. राठी यांना आऊट स्टँडीग सिनियर फॅकल्टी हा पुरस्कार जाहीर

हैद्राबाद येथील नामांकित ईलेट्स टेक्नोमिडीया या संस्थेतर्फे या वर्षीचा आऊट स्टँडीग सिनियर फॅकल्टी हा पुरस्कार लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयातील डॉ. विजयकुमार राठी यांना जाहीर झाला आहे. हैद्राबाद येथे 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जागतिक शिक्षण परिषदेत डॉ. राठी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रकी महाविद्यालयात 31 वर्षांपासून डॉ. राठी हे स्थापत्यशास्त्र विभागात प्रोफेसर म्हणून सेवेत आहेत. त्यांनी 2018 साली एसव्हीएनआयटी, सुरत येथील विद्यापीठात नॅनो मटेरीयल ईन कॉंक्रीट या विषयात पीएच.डी. पुर्ण केली. देश व विदेश पातळीवर त्यांचे 52 शोधनिबंध प्रसिध्द केले आहेत. उच्च शिक्षणाकरिता (एम.ई.) 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्याना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाविद्यालयात डॉ. राठी यांनी व्याख्याता, विभागप्रमुख, उपप्राचार्य व तांत्रिक संचालक, प्राचार्य अशा अनेक पदावंर काम केले आहे.

शिक्षक गौरव पुरस्कार अंतर्गत त्यांना आऊट स्टँडीग सिनियर फॅकल्टी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने, प्राचार्य प्रा. दशरथ मगर, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.