अशोक साहेबराव कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा कडून शिक्षणशास्त्र विषयात पी.एच. डी.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पदमभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या  प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. अशोक साहेबराव कांबळे यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद कडून शिक्षणशास्त्र विषयात पी.एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्या सौ. विदया वाजे यांनी दिली.

प्रा.  कांबळे यांनी “बुलढाणा जिल्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळामध्ये राबविण्यात आलेल्या अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमाच्या यशश्वीतेचा अभ्यास” या विषयावर डॉ. कृतिका चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला. या बद्दल  संस्थेचे अध्यक्ष  ना.  राधाकृष्ण विखे पाटील , खासदार सुजय  विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, महासंचालक डॉ. यशवंत  थोरात, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे,डॉ. हरिभाऊ आहेर. प्रा. दिगंबर खर्डे  या सर्वानी विद्यार्थ्यांचे अभिमानदं केले.