प्रवरेच्या कृषी महाविद्यालयात संविधान दिवस साजरा.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकताच भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली.

या वेळी महाविद्यालयातील विविध मान्यवरांनी भारतीय संविधाना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मौजे चंद्रापुर येथे प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रा. रमेश जाधव,, प्रा.वाल्मिक जंजाळ, डॉ. गोविंद  शिऊरकर, प्रा. प्रियांका दिघे,प्रा.विशाखा देवकर आदि सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा संदीप पठारे यांनी केले.

फोटो कॅप्शन:-लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकताच भारतीय संविधान दिवस दिवसानिमित्त  मौजे चंद्रापुर येथे प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.याप्रसंगी  प्राचार्य रोहित उंबरकर, प्रा. रमेश जाधव,, प्रा.वाल्मिक जंजाळ, डॉ. गोविंद  शिऊरकर, प्रा. प्रियांका दिघे,प्रा.विशाखा देवकर आणि विद्यार्थी