वक्तृत्व विषयातील महत्त्वाच्या स्पर्धेपैकी महाराष्ट्रात प्रसिध्द आणि मानाची समजली जाणाऱ्या ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा” मध्ये “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! या विषयावर चौकस आणि अभ्यासपुर्ण मत मांडणाऱ्या पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा संघ यंदाचा फिरत्या चषकाचा मानकरी ठरला.
‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्ध्येच्या ३९ व्या वर्षी “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! असा विषय ठेवण्यात आला होता. अहमदनगर,धुळे ,नाशिक औरंगाबाद, पुणे सह राज्यभरातील सुमारे ३० वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातून ६० स्पर्धक सहभागी झाले होते यात ३७ मुलींनी उल्लेखनीय असा सहभाग नोंदविला. नाशिक येथील नासा-स्पेस च्या अभियंत्या सौ. अपुर्वा जाखडी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सौ. शालिनीताई विखे पाटील , प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सदस्य आणि सचिव श्री भारत घोगरे, परीक्षक आर.बी.एन बी महाविद्यालयातील डॉ. उज्वला भोर,शेवगाव येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. ओंकार रसाळ,संगमनेर महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राचे समन्वयक व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक लिंबेकर, प्राचार्य डॉ. प्रदीप दीघे प्रा. दत्तात्रय थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपप्राचार्य डॉ. रामचंद्र रसाळ यांनी प्रास्ताविक केले.
पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील निखिल बेलोटे आणि कु.आश्विनी टावरे यांच्या संघाला फिरता पद्मश्री विखे पाटील करंडक आणि २१००/-चे पारितोषिक देण्यात आले तर, तसेच गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्या वरिष्ट गटातील पहिल्या चार क्रमांकाच्या निखिल बेलोटे आणि कु.आश्विनी टावरे स्पर्धकांना ७,१०१/-रू पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रक, द्वितीय क्रमांकांचे ५१०१/-रू,चे पारितोषिक पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील सुमित मेहेत्रे आणि तृतीय क्रमांकाचे आणि ३,१०१/-रू चे पारितोषिक पुणे जिल्ह्यातील वारजे येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सुमित काळगे या स्पर्धकाला राजे, उतेजनार्थ १५००/- चे पारितोषिक लोणी येथील कृषी महाविद्यालयातील ऋषिकेश चोळके या स्पर्धकांनी मिळविले.
कनिष्ठ महाविद्यालय गटातील संगमनेर येथील विशाल कानवडे याला प्रथम क्रमांकाचे २,५०१/-रू, प्रवरा कन्या विद्यामंदिरची कु. हृतिक वाघ या विद्यार्थिनीला द्वितीय क्रमांकाचे ,२,१०१/-रू चे पारितोषिक आणि प्रवरा पब्लिक स्कुलच्या कु. करुणा जगताप तृतीय क्रमांकाचे १,५०१/-रू चे पारितोषिक तर उत्तेजनार्थ ७०१/-रुपयांचे पारितोषिक पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील कु. आकांशा पवार या स्पर्धकांनी मिळविले. गुणानुक्रमे पहिल्या दहा संघांना प्रवास खर्च, सर्व स्पर्धकांना मोफत भोजन आणि निवास व्यवस्था आणि विजेत्या स्पर्धकांना स्मृति चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
अपुर्वा जाखडी यांनी आजच्या काळात मुलं-मुलींमध्ये फारसा भेदभाव केला जात नसला तरी मिळालेल्या संधीचा योग्य वापर करून समाजासाठी काम करू शकतो असे सांगताना प्रवरेच्या महाविद्यालयांमधून विदयार्थी विकसित होणारे विविध कार्यक्रम राबविले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तर, सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांनी माध्यमांचा वापर केवळ माहिती मिळविण्यासाठीच करावा तसेच वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या भेटवस्तू मध्ये पुस्तकाचा समावेश असावा असी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी आभार व्यक्त केले.
संयोजन समितीचे प्रा.उत्तम येवले,प्रा. डॉ राजेंद्र सलालकर,प्रा.अनिल गाढवे, डॉ, वैशाली मुरादे,डॉ. भाऊसाहेब रणपिसे यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
फोटो कॅप्शन:- लोणी येथे प विखे पाटील कला,विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन रौप्य करंडक वाद विवाद स्पेर्धेमध्ये यंदाचा मानकरी ठरलेल्या पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या संघातील निखिल बेलोटे आणि कु.आश्विनी टावरे या स्पर्धकांना फिरता चषक आणि ७,१०१/-रू पारितोषिक प्रदान करताना नासा-स्पेस च्या अभियंत्या सौ. अपुर्वा जाखडी, सौ. शालिनीताई विखे पाटील , सचिव भारत घोगरे,,प्राचार्य डॉ प्रदीप दिघे, उपप्राचार्य प्रा डी जी थोरात,प्रा सी एस गलांडे,कार्याध्यक्ष डॉ शांताराम चौधरी.