लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये ७ गर्ल्स बटालियन औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी शिबिरे सुरु असून एकून च्यार टप्प्यात होत असलेल्या या एकून बिरातील पहिल्या टप्प्यात महारातील सुमारे ४०० मुलीनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती लेप्टनंन्ट डॉ. राजेंद्र पवार यांनी दिली.
औरंगाबाद येथिल ग्रुप कमांडर ब्रिगेडियर श्री मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कमांडंट कर्नल अनुपम रंधावा सुभेदार मेजर बलवरसिंग,जसपालसिंग थापा, गंगा,सोहनलाल ,अजय साहू ,श्री ताठे हे साबीर घेण्यासाठी काम करीत असून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय थोरात,डॉ. रामचंद्र रसाळ, सौ. छाया गलांडे, एन.सी.सी ऑफिसर कॅप्टन सौ, सुजाता देव्हारे,यांच्या सहकार्याने एकून चार टप्यामध्ये हे शिबीर पार पडणार आहेत.
या शिबिरामधील पहिल्या टप्प्यात सहभाग घेतलेल्या ४० मुलींची दिल्ली येथे होणाऱ्या ‘थल सेने कॅम्प साठी महाराष्ट्र निदेशलयातर्फे निवड करण्यात आली आहे. शिबिरामध्ये निवड झालेल्या मुलींसाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. या मध्ये प्रामुख्याने फायरिंग ऑप्स्टाकल,म्याप रिडींग,टेन्ट पिचिंग,हेअल्थ व हायजीन, जजींग,डीस्टम्स,आदींचा समावेश आहे. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या मुलींना एन.सी.सी ए बी सी. प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र दिले जाते. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कलागुनकार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . विखे पाटील महाविद्यालयाच्या वतीने राहण्याची आणि जेवणाची सोया करण्यात अली. आहे.
फोटो कॅप्शन :- लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये ७ गर्ल्स बटालियन औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी शिबिरे सुरु असून एकून च्यार टप्प्यात होत असलेल्या या शिइकून बिरातील पहिल्या टप्प्यात महारातील सुमारे ४०० मुलीनी सहभाग नोंदवला.