पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जलशक्ती अभियाना साठी लोकसहभाग द्यावा- ना.सौ. शालिनीताई विखे पाटील

दुष्काळाची झळ बसलेल्यांनाच पाण्याची किंमत कळते. भविष्यात युध्द  पाण्यावरूनच होतील हे लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे यांनी ओळखले होते म्हणूनच पाण्यासाठी त्यांनी गावपातळी पासून देश पातळीवर पाणी प्राश्नावर आवाज उठविला होता.  असे सांगताना, आता प्रत्येक योजनांसाठी शासनावर  अवलंबून राहण्यापेक्षा जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर असलेल्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील  जलशक्ती अभियान राबविण्यासाठी लोकसहभाग द्यावा असे आवाहन  जिल्ह्या परिषदेच्या  अध्यक्षा ना.सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स ) अंतर्गत कृषी विभाग महाराष्ट्र  सहकार्याने आणि जलशक्ती मंत्रालय (पेयजल व स्वच्छता विभाग भारत सरकार )द्वारा संचालित बाभळेश्वर  केलेल्या जलशक्ती मेळावा व मिनी प्रदर्शन कार्यक्रमाचे उदघाट्न करताना ना.सौ शालिनीताई विखे पाटील  होत्या. या प्रसंगी रक्षामंत्रालयातील विभागीय आयुक्त आणि केंद्रशासनाने निरीक्षक अभिशांत पांडा जिल्हा कृषी अधिक्षक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ . सुधाकर बोऱ्हाळे,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी भारत घोगरे,  आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ.संभाजी नालकर यांनी प्रास्थाविक केले. या वेळी डॉ. धनंजय धनवटे,संपतराव वाघचौरे,कैलास पठारे, उद्धवराव मोटे, संजय राऊत,प्रसाद देशमुख भागवतराव गागरे या जिल्ह्यातील मान्यवरांनी जलसंधारना संदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या विविध कामांचे अनुभव मांडले.

ना.सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्याकी, एकीकडे महापूर तर, दुसरीकडे दुष्काळ.एकाच जिल्ह्यात भिन्न परिस्थिती असे चित्र का निर्माण झाले याचा विचार आता सर्वानीच करण्याची गरज असून,नवीन पाणी निर्मिती साठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत आवाज उठविला होता याची आठवण करून देताना,पाण्याची उपलब्धता,वापर आणि संधारणा  साठी शासनाचे व्यक्तिगत पातळीवर  अनुदान मिळत असले तरी, हेच काम संस्थांनी केल्यास त्यानाही जलसंधारणाच्या या कामासाठी प्रोस्थाहन म्हणून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा व्यक्त करताना , नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ.  यशवंत थोरात यांनी भविष्यात देशातील मोठा भूभाग कोरडा होण्याची भीती व्यक्त केली असल्याचे त्या म्हणाल्या, डॉ. थोरात यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रवरा परिसरातील विविध संस्थांमध्ये पाणी वापर आणि बचतीच्या योजना राबवीत असल्याचे सौ. विखे यांनी सांगितले. पर्यावरण वाचविण्यासाठी सरकारच्या योजनांना प्रत्येकाने हातभार लावण्याची आवशकता असल्याचेही  त्या यावेळी म्हणाल्या.