लोकनेते बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत भारताचे पहिले शिक्षणमंत्री डॉ.मौलाना अब्दुल आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले. असल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, एम.व्ही.पी कृषी महाविद्यालय नाशिक येथील प्रा.एस.एस.अहिरे, के.के.वाघ कृषी महाविद्यालय येथील साहाय्यक प्रा.आर.एम.रौदाळ यांच्या उपस्थित आणि रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.के.डी. काळे यांच्या हस्ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि स्वतंत्र सैनिक डॉ. मौलाना अबुल आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी रासेयो स्वयंसेवक कु.देवयानी गोंदकर याने आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून कु.देवयानी गोंदकर हिने स्वयंसेवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी प्रा.सारिका गाढे, प्रा.मनीषा आदिक,प्रा.स्वप्नील नलगे तसेच महाविद्यालयाचे इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तसेच रासेयो चे सर्व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कु.रुचिका चौधरी हिने केले. तसेच महाविदयलायचे प्रा.अमोल सावंत यांनी आभार मानले.