कृषी महाविद्यालय लोणी आणि गोगलगाव,लोणी खुर्द,आडगाव ग्रामपंचायतींच्या संयुक्तविद्यमाने जलशक्ती अभियान अंतर्गत विहीर पुनर्भरण कार्यक्रमासाठी साठी उत्स्फूर्त प्रतिसाद

भूगर्भातील पाणी पातळी उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २०१९-२० अंतर्गत सुरु केलेल्या जलशक्ती अभियान या योजने अंतर्गत राहाता  पंचायत समितीच्या वतीने मौजे गोगलगाव,लोणी खुर्द, आडगाव या गावात नुकताच विहीर पुनर्भरण कार्यक्रम घेण्यात आला  लोणी येथील कृषी महाविद्यालययांच्या सयुंक्त विद्यमाने हाती घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती  कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.

सन २०१८-१९ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत निवड व दुरुस्ती झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विहीर पुनर्भरण हि संकल्पना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजून सांगण्यात आली. सदर महत्वकांक्षी कार्यक्रम राज्याचे गृह निर्माण मंत्री  ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा  ना.सौ. शालिनीताई विखे पाटील,खासदार  डॉ. सुजय विखे पाटील तसेच लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांच्या संकल्पनेतून पार पाडण्यात आला. या कार्यक्रमास राहाता पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री. समर्थ शेवाळे , संस्थेचे सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे,व प्राचार्य प्रा. निलेश दळे आदींचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री.जी. आर. कदम व विस्तार अधिकारी (कृषी)श्री. प्रवीण चोपडे यांनी कृषी  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जलशक्ती अभियानाचे महत्व समजून सांगितले. या कार्यक्रमास महाविद्यालाचे प्रा. रमेश जाधव, प्रा. अमोल खडके व डॉ. गोविंद शिऊरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

फोटो कॅप्शन:-कृषी महाविद्यालय लोणी आणि  गोगलगाव,लोणी खुर्द,आडगाव ग्रामपंचायतींच्या संयुक्तविद्यमाने जलशक्ती अभियान अंतर्गत विहीर पुनर्भरण कार्यक्रम राबविताना महाविद्यालयाचे प्राध्यापक  आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी