कृषी व संलग्नित शिक्षण पदवी प्रवेशासाठी प्रवरा परिसरात सेतू सुविधा केंद्र कार्यान्वित

महाराष्ट्र शासनाने जैवतंत्रज्ञान, कृषी, उद्यानविद्या, वनविद्या,मत्स्यशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान या अभ्यासक्रमाना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केल्या नुसार चालू शैक्षणिक वर्षासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी येथे सेतू सुविधा केंद्र कार्यान्वित झाले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर यांनी दिली.

कृषी पदवीच्या १४ हजार ६९७ जगाचे प्रवेश यंदा सर्वंकष अशा सामायिक प्रवेश परीक्षेतूनच (सीईटी) होणार आहे. राज्यात चार कृषी विदयापिठातील आठ विद्याशाखामध्ये १७७ महाविद्यालयात प्रवेशासाठी यंदाची प्रवेश-सेतू केंद्राच्या मदतीने प्रवेश प्रक्रिया ०७ जुन पासून सुरु झालेली आहे.

प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी www.mahacet.org या संकेतस्तळावर विध्यार्थ्याला नोंदणी करावी लागणार असून नोंदणी करताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अधिभार, प्रवर्ग विषयक माहिती द्यावी लागेल. त्याच्याशी संबधित कागदपत्रेदेखील प्रवेश सेतू केंद्राद्वारे स्कॅन करून अपलोड करावे लागतील. या प्रवेशप्रक्रियेसाठी प्रत्येक जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील निवडक महाविद्यालयात सेतू केंद्र सुरू झाले असून प्रवरा परिसरामध्ये प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी, प्रवरा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, पायरेन्स इन्स्टीट्युट ऑफ बिसनेस मॅनेजमेंट अँड ऍडमिनीस्ट्रेशन व पायरेन्स इन्स्टीट्युट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॅाजी, आय. टी. आय. कॅम्पस, चंद्रापुर रोड, लोणी येथे सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. प्रवेश-सेतू केंद्रावर नोंदणी नंतर कृषी व संलग्नित प्रवेशासाठी २० जून ते ७ जुलै या दरम्यान Maha-agriadmission.in या संकेतस्तळावर विध्यार्थ्याला महाविद्यालयाचे विकल्प भरता येईल. प्रवेशासाठी ऑनलाईन चार फेऱ्या होतील. उर्वरित रिक्त जागांसाठी जागेवरील प्रवेश फेरी होईल.

तरी विध्यार्थ्यानी प्रवेशाकरिता नोंदणी केल्यापासून प्रवेश निश्चित होईपर्यंत प्रवेश-सेतू सुविधा केंद्रामध्ये संपर्क साधावा व तसेच कृषि व कृषी संलग्नित अभ्यासक्रमा बाबत अधिक माहितीसाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, लोणी येथे संपर्क करावा असे आवाहन लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी केले. तसेच, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया स्वतंत्र असून त्याबाबतच्या माहितीसाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी येथे संपर्क करण्याचे आवाहन प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर यांनी केले.

चौकट: व्यावसाईक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवरा शैक्षणिक संकुलातील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रवरा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, पायरेन्स इन्स्टीट्युट ऑफ बिसनेस मॅनेजमेंट अँड ऍडमिनीस्ट्रेशन व पायरेन्स इन्स्टीट्युट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॅाजी, आय. टी. आय. कॅम्पस, चंद्रापुर रोड, लोणी येथे सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.