पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रवरा कृषीजैवतंत्रज्ञान, सिमॅसेस लर्निंग एलएलपी, पुणे व म.फु.कृ वि यांच्यामध्ये सामंजस्य करार

कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि  सिमॅसेस लर्निंग एलएलपी पुणे, या संस्थेच्या पुढाकारातून कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार झाला असल्याची माहिती कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.

केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषिक्षेत्रात व्यावसाईक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगरक्षम वयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयापैकी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची निवड झाली असल्याचे  प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी सांगितले.

या कोर्ससाठी श्री.अंकित माहेश्वरी प्रोजेक्ट हेड सिमॅसेस पुणे, श्री.अमोल बिरारी मॅनेजर सकाळ ग्रुप आणि श्री.दिलीप क्षिरसागर स्किल डेव्हलेपमेंट समन्वयक म.फु.कृ.वि. राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जात आहे.तसेच या करारासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट अधिकारी प्रा. महेश चंद्रे, स्किल डेव्हलपमेंट समन्वयक प्रा.स्वप्नील नलगे तसेच प्रा.अमोल सावंत यांनी विशेष परिश्रम घेणार आहे.

दोन महिन्याचे प्रशिक्षण हे निशुल्क असून, पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, भारत सरकार यांचे द्वारे प्रमाणपत्र असून रोजगार मिळण्यापर्यंत मदत केली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ऍग्री पॉलिटेक्निक डिप्लोमा / ऍग्री टेक्निकल स्कुल सर्टिफिकेट / १२ वी (विज्ञान पास) याना प्राधान्य दिले जाणार आहे.  त्याच अनुषंगाने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी मध्ये या प्रशिक्षणाला सुरुवात येत्या १५ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यामध्ये कृषी विस्तार सेवा प्रदाता (अग्री एक्सटेंशन ऑफिसर) आणि दुग्ध उत्पादक/उद्योजक (डेरी फार्मर/इंटरप्रेणुर) या दोन विषयाचा समावेश करण्यात आला आहे.

नावनोंदणी सुरू झाली असून, वरील पैकी आवडत्या एका विषयाचे ज्ञान घेण्यासाठी बेरोजगार तरुण, गरजू विद्यार्थी यांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा व अधिक माहितीसाठी (९८६०७४३९६१,८६००९०३९६१) या मोबाईल वर संपर्क करण्याचे आवाहन सिमॅसेस लर्निंग एलएलपी संस्थेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामधील प्रशिक्षण समन्वयक श्री.ऋषिकेश तांबे यांनी केले.या कराराबद्दल राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,युवा नेते खासदार सुजय विखे पाटिल,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, सहसचिव श्री.भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, अतांत्रिक विभागाचे प्रा.दिगंबर खर्डे,शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,तांत्रिक विभागाचे संचालक डॉ.के.टी.व्ही रेड्डी,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ.धनंजय आहेर आदिंनी अभिनंदन केले.