पदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्षातील विद्यार्थी व पालक मेळावा

अभ्यासाबरोबरच प्रात्यक्षिकाचे कौशल्यज्ञान महत्वाचे आहे. कोणत्याही एका कौशल्यावर आपले पुढील करीयरची दिशा ठरते. जिद्द व मेहनत घेतल्यास यश हमखास मिळत असल्याचे मत अहमदनगर येथील वर्षा ग्रुप इंडस्ट्रीजचे संचालक निखील लुणे यांनी व्यक्त केले.       

पदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्षातील विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी वियार्थ्यांना मार्गदर्शन करतान ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक बन्सी तांबे पाटील होते. यावेळी प्राचार्य डॉ.व्ही.आर.राठी, ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा.धनंजय आहेर, उपप्राचार्य प्रा.नामदेव गरड, प्रा. सोमनाथ लव्हाटे, विभाग प्रमुख राजेंद्र साबळे, विभाग प्रमुख प्रा.डी.के.शिरसाठ, प्रा. इ.आर.घोगरे, प्रा.आर.व्ही.लावरे, प्रा.राजेंद्र निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.         

बन्सी पाटील तांबे म्हणाले की, प्रवरेत विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधला जातो. पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारानेच प्रवरेची घोडदौड सुरू असून संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून अनेक नविन उपक्रम सुरू आहेत. प्रवरेतील विद्यार्थी आज देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक महत्वांच्या पदांवरती कार्यरत आहेत. देशातील अग्रगण्य संस्था म्हणून प्रवरेचे नाव आहे.       

प्राचार्य डॉ. विजय राठी म्हणाले की, उत्कृष्ठ अभियंता होण्यासाठी कौशल्य महत्वाचे असून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्ञान देखील मिळविणे गरजेचे आहे. या पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व क्षेत्रात परिपुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध कंपन्यामधून विद्यार्थ्यांना दरवर्षी भेटी व प्रशिक्षण दिले जात असल्याने मुलाखतीच्यावेळी विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कँम्पस मुलाखतीद्वारे नोकरीच्या संधी प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.       

यावेळी प्रथम वर्षातील प्रवेशीत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.रवींद्र काकडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.सोमनाथ लव्हाटे यांनी आभार मानले.      

फोटोकॅप्शन – पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्ष प्रवेशीत विद्यार्थी व पालकमेळाव्यात मार्गदर्शन करताना अहमदनगर येथील वर्षा ग्रुप इंडस्ट्रीजचे संचालक निखील लुणे, समवेत प्राचार्य डॉ.व्ही.आर.राठी.