प्रवरा अभियांत्रिकी महाविदयालयाच्या सिव्हील इंजिनिअरींग शाखेत उद्योजगता विकास या विषयावर तज्ञ मार्गदर्शन संपन्न

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा आवश्यक असते. आपल्या प्रत्येकामध्ये विशिष्ट गुण असतोच तो विकसित करण्यासाठी  आपण ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडायला हवे,” असा सल्ला पालघर येथील भक्तीवेदांत कौशल्य विकास केंद्राचे प्राचार्य श्री. आनंद गोसावी यांनी प्रवरा अभियांत्रिकी महाविदयालयाच्या सिव्हील इंजिनिअरींग शाखेत उद्योजगता विकास या विषयावर मार्गदर्शन करताना दिला. 

प्रवरा अभियांत्रिकी महाविदयालयाच्या सिव्हील इंजिनिअरींग शाखेत उद्योजगता विकास या विषयावर नुकतेच पालघर येथील भक्तीवेदांत कौशल्य विकास केंद्राचे प्राचार्य श्री. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली  संपन्न झाले. महाविदयालयाच्या वतीने प्रा. राजेंद्र खर्डे यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी श्री. आनंद गोसावी यांनी उद्योजिकता विकास या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थांना उद्योजक बनन्या करता आवश्यक अशा पैलुंची माहिती दिली जी विदयार्थांनी अंगिकारली पाहीजे. जेणेकरून भविष्यात विद्यार्थांना त्यांचा उद्योग यशस्वीरीत्या उभारून आयुष्यात यश संपादन करता येईल. तसेच सिव्हील इंजिनिअरींग विभागाचे विभागप्रमुख प्रा. रविंद्र आमले यांनी या तज्ञ मार्गदर्शन आयोजन करण्याचा उद्देश सांगताना सांगितले कि, सिव्हील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी या तज्ञ मार्गदर्शनानुसार त्यांच्या आयुष्यात कसा बदल घडवावा याबद्दल सांगितले. हा तज्ञ मार्गदर्शनाचा कार्यक्रम महाविदयालयातील उद्योजिकता विकास कक्षाअंतर्गत सिव्हील इंजिनिअरींग शाखेने आयोजित केला होता.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिव्हील इंजिनीअरींग विभागाचे विभागप्रमुख प्रा. रविंद्र आमले, विभागाचे उद्योजगता विकास कक्षाचे समन्वयक प्रा. अतुल जोंधळे, प्रा. निलेश कापसे व सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 

फोटो कॅप्शन:-प्रवरा अभियांत्रिकी महाविदयालयाच्या सिव्हील इंजिनिअरींग शाखेत उद्योजगता विकास या विषयावर मार्गदर्शन करताना  भक्तीवेदांत कौशल्य विकास केंद्राचे प्राचार्य श्री. आनंद गोसावी,प्रा. राजेंद्र खर्डे आणि विदयार्थी.