कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि सिमॅसेस लर्निंग एलएलपी पुणे, या संस्थेच्या पुढाकारातून झालेल्या सामंजस्य कराराद्वारे प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना एपीजी लर्निंग पुणे यांच्या तर्फे सहा दिवसीय एप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.
केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषिक्षेत्रात व्यावसाईक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगरक्षम वयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयापैकी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची निवड झाली असल्याचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी सांगितले.
या कोर्ससाठी श्री.अंकित माहेश्वरी प्रोजेक्ट हेड सिमॅसेस पुणे, श्री.अमोल बिरारी मॅनेजर सकाळ ग्रुप आणि श्री.दिलीप क्षिरसागर स्किल डेव्हलेपमेंट समन्वयक म.फु.कृ.वि. राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जात आहे.तसेच या करारासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट अधिकारी प्रा. महेश चंद्रे, स्किल डेव्हलपमेंट समन्वयक प्रा.स्वप्नील नलगे तसेच प्रा.अमोल सावंत यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.
दोन महिन्याचे प्रशिक्षण हे निशुल्क असून, पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, भारत सरकार यांचे द्वारे प्रमाणपत्र असून रोजगार मिळण्यापर्यंत मदत केली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ऍग्री पॉलिटेक्निक डिप्लोमा / ऍग्री टेक्निकल स्कुल सर्टिफिकेट / १२ वी (विज्ञान पास) याना प्राधान्य दिले जाणार आहे. त्याच अनुषंगाने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी मध्ये या प्रशिक्षणाला सुरुवात येत्या १५ सप्टेंबर पासून सुरवात झाली आहे.यामध्ये कृषी विस्तार सेवा प्रदाता (अग्री एक्सटेंशन ऑफिसर) आणि दुग्ध उत्पादक/उद्योजक (डेरी फार्मर/इंटरप्रेणुर) या दोन विषयाचा समावेश करण्यात आला असल्याचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामधील प्रशिक्षण समन्वयक श्री.ऋषिकेश तांबे यांनी सांगितले
या कराराबद्दल राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,युवा नेते खासदार सुजय विखे पाटिल,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, सहसचिव श्री.भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, अतांत्रिक विभागाचे प्रा.दिगंबर खर्डे,शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,तांत्रिक विभागाचे संचालक डॉ.के.टी.व्ही रेड्डी,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ.धनंजय आहेर आदिंनी अभिनंदन केले.
फोटो कॅप्शन :-प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना एपीजी लर्निंग पुणे यांच्या तर्फे सहा दिवसीय एप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण प्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत एपीजी लर्निंग चे प्रशिक्षक श्री. विनायक घावले व श्री. भालचंद्र देशपांडे, संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. धनंजय आहेर, प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे, महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. महेश चंद्रे.आदी.