प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाचा उसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी जनजागृती कार्यक्रम

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालय उसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी शेतकरी वर्गात जनजागृती होण्यासाठी कोल्हार खुर्द ता. राहुरी येथे शेतकरी मेळाव्याने करण्यात आले असल्याची माहिती कृषी महाविद्यालयचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली. .

यावेळी श्रीरामपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. संजय काचोळे, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, प्रवरानगराचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात , कोल्हार खुर्द चे सरपंच श्री. प्रकाश पाटील शिरसाठ, उपसरपंच श्री. किशोर घोगरे, अनिल पाटील शिरसाठ, सुरेश पाटील शिरसाठ, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयचेप्राचार्य प्रा. रोहित उंबरकर आदि मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष गृहनिर्माण मंत्री. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करणार आले होते.

श्री. संजय काचोळे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातील कृषीदूत व कृषीकन्या यांच्या माध्यमातून उसावरील हुमणी कीड नियंत्रण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे सांगितले. तरशास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात यांनी हुमणी कीड नियंत्रण करण्यासाठी कोण कोणत्या उपाय योजना राबविल्या हव्यात याची विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिली. या वेळी सरपंच श्री. प्रकाश पाटील शिरसाठ, अनिल पाटील शिरसाठ यांनी देखील मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रा.निलेश दळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. रमेश जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी कार्यांसाठी प्रा.अमोल खडके, प्रा.वाल्मिक जंजाळ,प्रा. संदीप पठारे, प्रा. विक्रम राऊत आदी वग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातील कृषीदूत व कृषीकन्या यांचे सहकार्य लाभले.