प्रवरेत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न – शिक्षणाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करा-सौ.सुजाता थेटे

लांबी,रुंदी आणि खोली शिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही, आपल्या जीवनाचे हि तसेच आहे. असे सांगताना तरुण पिढीने दीर्घ जीवणासाठी प्राप्त केलेल्या ज्ञान आणि अर्थार्जतुन दुसऱ्याला मदत होईल या भावनेने काम केले तरच शिक्षण घेतल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुजाता थेटे यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी यथे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी सौ. सुजाता थेटे बोलत होत्या.या प्रसंगी कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.मिनल शेळके, प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.महेश चंद्रे, प्रा.निलेश सोनुने, प्रा.स्वरांजली गाढे आणि आणी शिक्षक उपस्थित होते.

सौ.सुजाता थेटे म्हणाल्या कि, जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही वस्तू पूर्ण केव्हा होते तर जेव्हा लांबी, रुंदी आणि खोली असते तेव्हा आपल्या जीवनातही निर्मिती पूर्ण झाल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, यानिमित्त लांबी म्हणजे दीर्घ जीवन, रुंदी म्हणजे ज्ञानप्राप्ती करा पदव्या प्राप्त करा आणि पैसे मिळवा, खोली म्हणजे दुसऱ्या काही करणे आपले ज्ञान पदव्या,पैसा यातील काही भाग तरी दुसऱ्याच्या भल्यासाठी उपयोग होयला आहे तरच तुमच्या शिक्षणाचा फायदा होईल असे त्या म्हणाल्या.

यावेळी प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जे शिक्षण घेतले आहे त्या बळावर त्यांनी आपल्या स्वत:चा अवकाश निर्माण करावा, केवळ नशीबावर अवलंबून न राहता आपली क्षमता दाखवून द्यावी व उच्च ध्येय ठेऊन पुढच्या काळासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाबरोबर सर्वांगिण विकास महत्त्वाचा आहे. समाजात उपयोगी आयुष्य जगतांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तसेच ज्ञानाला शालिनतेचि जोड मिळाल्यास आदर्श व्यक्तीमत्व घडतील असे प्रतिपादन प्रा.गायकर यांनी केले.

अंतिम वार्षितील विद्यार्थी सोनाली बनकर,विद्या वर्धीनी,आभा मुसळे, अश्विनी सोळुंके,सौरभ फुलपगार,अतुल जांभुळकर, सौरभ भालके,चेतन मोरे यां विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून निरोप समारंभात गहिवरून आले व या महाविद्यालयात येऊन आम्हाला आमचे शाळेतील दिवस आठवले व येथे खूप नविन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या व परत या महाविद्यालयात येता येणार नाही याची पण खंत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.सूत्र संचालक तृतीय वर्षातील विद्यार्थी स्वप्नील गावडे व प्रेषिता यंदे यांनी केले व शेवटी आभार प्रा.सिताराम वरखड यांनी मानले.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ. सुजाता थेटे,संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्रा.सौ.मिनल शेळके, प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.महेश चंद्रे, प्रा.निलेश सोनुने, प्रा.स्वरांजली गाढे आदी.